तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने वीज खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीसा
By किशोर कुबल | Published: February 28, 2024 02:36 PM2024-02-28T14:36:00+5:302024-02-28T14:36:10+5:30
तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल वीज खात्याने दोन लाइन हेल्परना कर्मचाऱ्यांना कारवाई का करू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. लाइन हेल्पर शशांक नाईक २३ सप्टेंबर २०२० पासून कामावर आलेला नाही.
किशोर कुबल
पणजी : तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल वीज खात्याने दोन लाइन हेल्परना कर्मचाऱ्यांना कारवाई का करू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. लाइन हेल्पर शशांक नाईक २३ सप्टेंबर २०२० पासून कामावर आलेला नाही. तर लाइन हेल्पर विल्सन फर्नांडिस १ नोव्हेंबर २०१९ पासून अनुपस्थित आहेत. हे दोन्ही कर्मचारी त्यांच्या पत्त्यावरही सापडलेले नसल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना कारण स्पष्ट करण्यास सांगितले आहे. विहित वेळेत त्यांच्याकडून उत्तर न मिळाल्यास प्रकरण एकतर्फी पुढे नेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा खात्याने दिला आहे.
दरम्यान, सरकारी नोकरीवर असताना खात्याला कल्पना न देताच अंधारात ठेवून विदेशात नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वरील प्रकरणात कसून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.