गोव्यात चार्टर विमानांची संख्या यावेळी 30 टक्क्यांनी वाढणार

By admin | Published: September 9, 2016 08:56 PM2016-09-09T20:56:47+5:302016-09-09T20:56:47+5:30

गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या पंचवीस दिवसांत सुरू होत आहे. यावेळी पर्यटनकांना घेऊन गोव्यात येणा:या चार्टर विमानांची संख्या सुमारे 30 टक्क्यांनी वाढेल.

The number of charter planes in Goa will increase by 30 percent | गोव्यात चार्टर विमानांची संख्या यावेळी 30 टक्क्यांनी वाढणार

गोव्यात चार्टर विमानांची संख्या यावेळी 30 टक्क्यांनी वाढणार

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.  ९-  गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या पंचवीस दिवसांत सुरू होत आहे. यावेळी पर्यटनकांना घेऊन गोव्यात येणा:या चार्टर विमानांची संख्या सुमारे 30 टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी गोवा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स संघटनेचा (टीटीएजी) हवाला दिला आहे.
नव्या पर्यटन मोसमासाठी गोवा सज्ज होऊ लागला आहे. याविषयी बोलताना मंत्री परुळेकर म्हणाले, की नुकतीच आपली टीटीएजीच्या पदाधिका:यांशी चर्चा झाली आहे. गोव्यात यावर्षी जास्त चार्टर विमाने येतील अशी माहिती त्या चर्चेवेळी टीटीएजीने आपल्याला दिली. 2क्14 साली एकूण 129क् चार्टर विमाने गोव्यात आली होती. 2क्15 साली मात्र हे प्रमाण कमी झाले व केवळ 96क् चार्टर विमाने आल्याची नोंद झाली होती. चार्टर विमानांची संख्या कमी होण्यास त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोष्टी कारणीभूत ठरल्या होत्या.
मंत्री परुळेकर म्हणाले, की यावेळी 1 हजार 3क्क् पेक्षाही जास्त चार्टर विमाने गोव्यात येतील असे टीटीएजीचे म्हणणो आहे. 3क् टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. यावेळी प्रथमच सुरत- गुजरात येथून देशी पर्यटकांना घेऊन चार्टर विमान येणार आहे.
परुळेकर म्हणाले, की गोव्यात ऑक्टोबरमध्ये होणा:या ब्रिक्स परिषदेनिमित्ताने दाबोळी विमानतळावरील सोयीसुविधा वाढविल्या जाणार आहेत. तेथील इमिग्रेशन काऊंटर्सची संख्या दुप्पट करावी अशी विनंती आम्ही केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे यापूर्वी केलेली आहे. सुमारे अकराशे प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावरून ब्रिक्स परिषदेनिमित्त गोव्यात येणार आहेत. त्यामुळे विमानतळावर गर्दी होईल. त्यामुळेच सुविधा वाढवायला हव्यात. शिवाय गोव्याला अधिक सुरक्षा व्यवस्थाही पुरविण्याची विनंती केंद्रास केलेली आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल. पर्यटन मोसमावेळी गोव्यात सुरक्षा वाढणो गरजेचे आहे.
 

Web Title: The number of charter planes in Goa will increase by 30 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.