गोव्यात कोविड बळींची संख्या सहाशेच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 07:16 PM2020-10-29T19:16:56+5:302020-10-29T19:17:08+5:30
Corona Virus news: बांबोळी येथील गोमेको इस्पितळात कोविडमुळे गेल्या चोवीस तासांत एकूण पाचजणांचा प्राण गेला.
पणजी : कोविडमुळे गुरुवारी पाचजणांचे बळी गेले. यामुळे एकूण बळींची संख्या सहाशेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत कोविडने ५९७ व्यक्तींचे गोव्यात बळी घेतले. गुरुवारी नवे २३३ कोविड रुग्ण राज्यात आढळले.
गुरुवारी कोविडच्या १ हजार ६८३ चाचण्या करण्यात आल्या. गेल्या चोवीस तासांत १९४ कोविडग्रस्तांनी कोरोनावर मात केली. बहुतेक गावांमध्ये आता कोविडग्रस्तांची संख्या कमी झालेली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटली व ही संख्या २ हजार ४३६ पर्यंत खाली आली आहे.
बांबोळी येथील गोमेको इस्पितळात कोविडमुळे गेल्या चोवीस तासांत एकूण पाचजणांचा प्राण गेला. आल्तिनो येथील ५८ वर्षीय महिला रुग्ण, फोंडा येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्ण, म्हापसा येथील ६० वर्षीय रुग्ण आणि साखळी येथील ७९वर्षीय रुग्ण यांचे कोविडमुळे निधन झाले. आल्तिनोच्या महिलेला मूत्रपिंडाचा गंभीर आजार होता. करूर कर्नाटक येथील एक ५५ वर्षीय महिला रुग्ण गोमेको इस्पितळात कोविडने मरण पावली.
काही प्रमुख ठिकाणची कोविड रुग्ण संख्या
मडगाव.............२१८
वास्को...............११७
फोंडा....................१५४
म्हापसा............९८
पणजी...............११६
कोलवाळे..............१२०
कांदोळी........................११०
चिंबल............१२८
पर्वरी............१३१
कुठ्ठाळी...........९४