गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वय वर्षे ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 10:31 PM2018-01-10T22:31:13+5:302018-01-10T22:31:24+5:30

गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे.

Number of teachers aged 55 years in government schools in Goa is significant | गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वय वर्षे ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय

गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वय वर्षे ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय

Next

पणजी : गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. नजीकच्या काळात त्यामुळे शिक्षकांची घाऊक सेवानिवृत्ती होईल.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आल्याची माहिती शिक्षण खात्याच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली. १९७0 च्या दशकात ज्या शिक्षकांची भरती झाली ते आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात सुमारे ८00 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. खासगी शाळा १९८0 च्या दशकानंतरच आल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २0२0 साली १५0 ते २00 सरकारी प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षक असणे हे एकादृष्टीने चांगलेच परंतु या ज्येष्ठ शिक्षकांना माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कठीण होत आहे. सुमारे ४५0 हून अधिक रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. सरकारी मराठी शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत. पटसंख्येअभावी गेल्या पाच वर्षात ११३ प्राथमिक शाळा बंद पडल्या. एक, दोन अशी अगदीच कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या काही शाळा जवळच्या दुसºया सरकारी शाळेत विलीन करण्यात आल्या.

चालू शैक्षणिक वर्षात (२0१७-१८) पटसंख्येअभावी ५ प्राथमिक शाळा जवळच्या सरकारी शाळांमध्ये विलीन करण्यात आल्या. साधनसुविधा विकास महामंडळाने चार वर्षांच्या काळात ३१९ शाळांची डागडुजी केली त्यावर ५८ कोटी ३५ लाख ७५ हजार २६८ रुपये खर्च करण्यात आले. ५८५ शाळांची दुरुस्ती अद्याप व्हायची आहे. शाळांच्या डागडुजीचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जात आहे. शाळेच्या इमारतीची प्रत्यक्ष स्थिती, संबंधित इमारतीची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे काय, शाळेतील विद्यार्थीसंख्या या सर्व गोष्टी विचारात घेऊन शाळा इमारतींची दुरुस्ती हाती घेतली जाते, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षात एकाही खासगी व्यवस्थापनाला नवीन शाळेसाठी परवानगी दिलेली नाही. २0१३-१४ या वर्षात ३९, २0१४-१५ या वर्षात ३५, २0१५-१६ या वर्षात १९ तर २0१६-१७ या शैक्षणिक वर्षात २0 प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या. विद्यार्थी कमी झाल्याने या शाळा बंद कराव्या लागल्या. पटसंख्या कमी झाल्यास नजीकच्या सरकारी शाळांमध्ये या शाळा विलीन केल्या जातात. अशा पाच शाळा चालू शैक्षणिक वर्षात विलीन करण्यात आल्या.

Web Title: Number of teachers aged 55 years in government schools in Goa is significant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा