तेल तवंगामुळे केळशीचा किनारा काळवंडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 11:17 AM2020-08-29T11:17:01+5:302020-08-29T11:17:34+5:30
या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर तेल गोळे आल्यानेच संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित झाल्याची माहिती जैव विविधता समितीचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी दिली.
मडगाव: तेल तवंग मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर पसरल्यामुळे संपूर्ण किनारपट्टी काळवंडून गेली असून, पर्यावरणमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केळशी जैवविविधता समितीने केली आहे. या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर तेल गोळे आल्यानेच संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित झाल्याची माहिती जैव विविधता समितीचे अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी दिली.
ते म्हणाले, एप्रिल मे महिन्यात समुद्रात मोठी जहाजे तेल सोडतात, त्यामुळे संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित होते. या जहाजावर तटरक्षक दलाने देखरेख ठेवावी अशी विनंती आम्ही केलेली असून पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांनीही या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी केळशी पंचायत आणी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या सहकार्याने ही किनारपट्टी साफ केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साफ करण्यात आला.