फेरीबोट भाडेवाढविरोधात रविवारी जुने गोवेत आंदोलन
By पूजा प्रभूगावकर | Published: November 4, 2023 01:31 PM2023-11-04T13:31:53+5:302023-11-04T13:32:38+5:30
राज्यातील विविध जलमार्गांवरील फेरीबोटींतून दुचाकींना प्रवास सध्या मोफत आहे. तर चारचाकी वाहनांकडून प्रती ट्रीप १० रुपये आकारले जातात.
पणजी: फेरीबोट भाडेवाढ व दुचाकींना लागू केलेल्या तिकिट विरोधात उद्या रविवारी जुने गोवेत आंदोलन होणार आहे. सदर भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी केली जाईल.
दिवाडी, चोडण, सांतईस्तेव तसेच फेरीबोटींव्दारे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या आंदोलनात सहभागी व्हावे अओ आवाहन कॉंग्रेसच्या कुंभारजुवे गट विभागाने केले आहे. रविवारी सकाळी १०.३० वाजता जुने गाेवे येथील फेरी धक्क्या नजीक हे आंदाेलन होईल.
राज्यातील विविध जलमार्गांवरील फेरीबोटींतून दुचाकींना प्रवास सध्या मोफत आहे. तर चारचाकी वाहनांकडून प्रती ट्रीप १० रुपये आकारले जातात. राज्यात एकूण १८ फेरीबोट मार्ग आहेत. त्यापैकी ७ मार्ग हे केवळ कुंभारजुवे मतदारसंघात आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना या फेरीबोट भाडेवाढचा सर्वाधिक फटका बसणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार दुचाक्यांना प्रती ट्रीप १० रुपये तर मासिक पास १५० रुपये, तिनचाकी व चारचाकी वाहनांना प्रती ट्रीप ४० रुपये तर मासिक पास ६०० रुपये इतका असेल. १६ नोव्हेंबर पासून हे दर लागू होणार असल्याने त्याला राजभरातून विरोध होत आहे.