२६ ऑक्टोबरला पंतप्रधान गोव्यात, प्रशासन कार्यक्रमासाठी व्यस्त
By वासुदेव.पागी | Published: October 14, 2023 04:36 PM2023-10-14T16:36:29+5:302023-10-14T16:37:07+5:30
पणजी: २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या उद्गाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आणि ...
पणजी: २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या उद्गाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठीही युद्धपातळीवर तयारी सुरू असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीमागून बैठकांचे सत्र चालू आहे.
२६ रोजी पंतप्रधान मोदी हे गोव्यात येणार असल्यामुळे सुरक्षा व स्वागताच्या तयारीसाठी युद्धपातळीवर धावपळ सुरू झाली आहे. इतर सर्व कामे बाजूला सारून सध्या पंतप्रधानाचा कार्यक्रम हा एक कलमी कार्यक्रम सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्रम पत्रिकेवर आहे.
पोलीस मुख्यालयात दर दिवशी किमान सात ते आठ बैठका होत आहेत. स्वत: पोलीस महासंचालक डॉ जसपाल सिंग हे सुरक्षा प्रबंधांवर देखरेख ठेऊन पाठपुरावाही करून घेत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीवर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दर दिवशी सुरक्षा विषयक तयारीची चाचणी घेताना प्रात्यक्षिकेही केली जात आहे. विमानतळावरून फातोर्डा येथे कार्यक्रमस्थळी पंतप्रधानाचा प्रवास कसा होणार याची माहितीही ऐनवेळीच जाहीर केली जाणार आहे.