गोव्यातील कला अकादमीच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानसभेत कामकाज रोखून धरले
By वासुदेव.पागी | Published: July 18, 2023 12:15 PM2023-07-18T12:15:33+5:302023-07-18T12:15:46+5:30
पहिल्याच दिवशी पहिल्या तासाला गदारोळ, कामकाज अर्धातास तहकूब
पणजी- विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी कला अकादमीचे बांधकाम कोसळण्याच्या मुद्द्यावरून आणि नूतनीकरणाच्या कथित घोटाळ्याच्या मुद्यावरून कामकाज रोखून धरले.
विरोधक भ्रष्टाचार विरोधी घोषणाचे फलकच घेऊन आले होते. सभापती सभागृहात येऊन राष्ट्रगीत झाल्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमावयांनी उभे राहून कला अकादमीच्या बांधकामाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणावर अर्धा तास चर्चा घेण्याची मागणी केली. या मागणीची सभापतीकडे आग्रह धरताना युरी आलेमाव, विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्टा, कार्लुसफारेया, वेन्जी विएगश, क्रूज सिल्वा,आणि विरेश बोरकर यांनी सभापतीच्या पटलाकडे धाव घेतली.सभापती रमेश तवडकर यांनी त्यांना प्रश्नोत्तराचे कामकाज संपल्यावर चर्चा करू या असे सांगितले.
मुख्यमंत्री. डॉ प्रमोद सावंत यांनीही नंतर या विषयावर ते निवेदन करणार असल्याचे सांगितले. मात्र विरोधक आपल्या चर्चेच्या मागणीवर ठाम राहिले. पाउणेबारा वाजेपर्यंतचे कामकाज रोखून धरले. त्यानंतरही विरोधकांनी कामकाज चालू न दिल्यामुळे सभापतींनी अर्धा तास कामकाज तहकूबकेल्याचे जाहीर केले.
एल्टनची वेगळी भुमिका
पहिल्याच दिवशी विरोधक आपले अस्तित्व व ताकद दाखवून देण्यासाठीकला अकादमीच्या मुद्यावरून सभागृहात गदारोळ करणार हे अपेक्षितहोते. मात्र त्यातही रणनीतीच्या बाबतीत ते गोंधळल्याचे दिसले. कारणएकीकडे चर्चेची मागणी करून विरोधक कामकाज रोखून धरत होते तरदुसरीकडे कॉंग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता हे सभापतींनी त्यांचे प्रश्नविचारण्यासाठीनाव पुकारल्यावर एल्टन आपल्या जागेवर जाऊन प्रश्नविचारू लागले. त्यांनाही विरोधकांनी प्रश्न विचारू दिला नाही ही गोष्टवेगळी, परंतु विरोधकांकडे ठोस रणनीती आणि ऐक्याचा अभाव मात्रयामुळे दिसुन आला.