गोव्यात कॉंग्रेस उमेदवाराच्या नातेवाईकाकडून एक कोटी रुपये जप्त
By admin | Published: January 30, 2017 11:47 PM2017-01-30T23:47:26+5:302017-01-30T23:47:26+5:30
सांत आंद्रे मतदारसंघाचे माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीचे कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या नातेवाईकाला मोठ्या रकमेसह पकडण्यात आले.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 30 - सांत आंद्रे मतदारसंघाचे माजी आमदार तथा विधानसभा निवडणुकीचे कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या नातेवाईकाला मोठ्या रकमेसह पकडण्यात आले. भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून सुमारे 1 कोटी रुपये त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.
रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. भरारी पथकाकडून एक वाहन अडविण्यात आले आणि त्या वाहनात मोठ्या प्रमाणात 500 रुयांच्या आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या. रात्री उशिरापर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. नोटा फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या मोजण्यास बराच विलंब लागला. त्यानंतर नोटा येथील आगशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या.
दरम्यान, या भागात पैशांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे भरारी पथकानेही कारवाई केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पोलीस गस्त आणि नाकाबंदी सुरू असताना पैसे घेऊन फिरण्याची जोखीम संशयितांच्या अंगलट आली.