आठवड्यातून एक दिवस मुलाला भेटायची होती परवानगी; आईला तेही पहावले नाही, मुलाचाच केला खून

By वासुदेव.पागी | Published: January 9, 2024 02:29 PM2024-01-09T14:29:12+5:302024-01-09T14:30:25+5:30

खून करून मृतदेह सुटकेशमध्ये घालून काढत होती पळ

One day a week was allowed to see the child The mother was not even allowed to see, the child was killed | आठवड्यातून एक दिवस मुलाला भेटायची होती परवानगी; आईला तेही पहावले नाही, मुलाचाच केला खून

आठवड्यातून एक दिवस मुलाला भेटायची होती परवानगी; आईला तेही पहावले नाही, मुलाचाच केला खून

पणजीः आपल्या घटस्फोटीत पतीची अद्दल घडविण्याच्या इर्षेने पेठलेल्या एका मोठ्या कंपनीच्या सीईओने आपल्या ४ वर्षे वयाच्या पोटच्या बोराचा गळा आवळून खून करण्याचा किळसवाणा प्रकार गोव्यात घडला आहे. न्यायालयाने वडिलांना आठवड्यातून केवळ एकच दिवस मुलाला भेटण्याची  दिली होती परवानगी, परंतु तीही न पाहावल्यामुळे तिने हे भयानक कृत्य केले. 

मातृत्वाला काळीला फासणाऱ्या या महिलेचा नाव सूचना सेथ असे असून ती एका मोठ्या आर्टीफिशल इंटेलीजन्स कंपनीच्या सीईओ आहे. तिचे पतीही विदेशात मोठ्या पदावर कामाला आहेत. परंतु दोघांमधील संबंध बिघडल्यामुळे घटस्फोटापर्यंत मामीला पोहोचला होता. न्यायालयाने अंतीम आदेशही दिला होता. त्यानुसार ४ वर्षाच्या मुलाची कोठडी आई सुचना हिच्याकडे दिली होती. मात्र आठवड्यातून एकदा मुलाला भेटण्याची परवानगी वडिलांना होती. परंतु वडिलांना अद्दल घडविण्याच्या इर्षेने पेठलेल्या सूचनांकडे तेही होऊ देणार नाही असे ठरविले आणि मुलाला गोव्यात आणून खून केला.

खून करून बँगमध्ये मुलाचा मृतदेह घालून बंगळूर येथे जात असताना चित्रदुर्ग जिल्ह्यात आयमंगला पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी तिला अटक केली. गोवा पोलिसांनी तशी खबर दिल्यामुळे आययमंगल पोलीसांनी ही कारवाई केली. सूचना ही मूळ बंगाल येथील असून तिच्या पतीचे घर बंगळूरला आहे.

गोव्याची एका रिसॉर्ट मध्ये सूचना आपल्या मुलासह आली होती. अचानक ती बंगळूरला जायला निघाली आणि जाताना तिच्याबरोबर मुलगा नव्हता. एक मोठी शुटकेश घेऊन ती निघाली होती. विमानाने प्रवास करण्या ऐवजी तिने टँक्सी बोलावल्यामुळे रिसॉर्टच्या करमचाऱयांना शंका आली. ती राहायला होती त्या खोलीत र क्ताचे डाग दिसल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलीसांना माहिती दिली. येथून तपासाचा चक्रे फिरली आणि ती पकडली गेली.  मुलाचा खून करून मृतदेह  सुटकेशमध्ये घालून ती चालली होती.

Web Title: One day a week was allowed to see the child The mother was not even allowed to see, the child was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.