हॉटेल मॅनेजमेंटमधील विनयभंग प्रकरणात त्या अद्यापकाची एक तास चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 07:53 PM2018-11-12T19:53:55+5:302018-11-12T19:53:58+5:30
विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याच्या प्रकरणातील संशयित पर्वरी येथील गोवा हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे ज्येष्ठ व्याख्याते पंकज कुमार सिंग याची पणजी महिला पोलीस स्थानकात सोमवारी एक तास चौकशी केली.
पणजी: विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याच्या प्रकरणातील संशयित पर्वरी येथील गोवा हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे ज्येष्ठ व्याख्याते पंकज कुमार सिंग याची पणजी महिला पोलीस स्थानकात सोमवारी एक तास चौकशी केली. या प्रकरणात त्याला पुन्हा चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी पंकज कुमारसिंग हे महिला पोलिसस्थानकात आले.
महिला पोलीस निरीक्षक सुदिक्षा नाईक यांनी त्याची चौकशी केली. त्याला विचारण्यात अलेल्या बऱ्याच प्रश्नांवर त्याला समाधानकारक उत्तरे देता आले नाहीत. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्याच्या अटकेची शक्यताही नाकारता येत नाही. संशयित पंकज कुमार याला पोलीस स्थानकात १२ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स ५ नोव्हेंबर रोजी बजावण्यात आला होता.
हॉटेल मेनेजमेंट संस्थेच्या विद्यार्थ्यांनिने या अद्यापकाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार पणजी महिला पोलीस स्थानकात नोंदविली होती.
अत्यंत असभ्य शब्दात शेरे मारून युवतीचा मानसिक छळ करण्यापासून इतर प्रकारचे लैंगिक छळही संशयिताने चालविले होते असे विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विशखा समितीकडे हे प्रकरण नेण्यात आले होते. परंत या समितीने तपासात काहीच प्रगती दाखविली नसल्यामुळे पुन्हा तपास करण्याची मागणीही पिडीत विद्यार्थिनीने केली होती. या तक्रारीला अनुसरून महिला पोलीससांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम ५०९, ३५४ (अ) आणि ३५४ अंतर्गत विनयभंग, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला होता.