एक जूनची डेडलाईन!

By Admin | Published: May 29, 2016 02:00 AM2016-05-29T02:00:31+5:302016-05-29T02:00:31+5:30

कुडचडे : जून महिन्यापासून गोव्यातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना दिलेले सरकारी अनुदान बंद करा; अन्यथा घरी बसण्याची तयारी ठेवा,

One June deadline! | एक जूनची डेडलाईन!

एक जूनची डेडलाईन!

googlenewsNext

कुडचडे : जून महिन्यापासून गोव्यातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना दिलेले सरकारी अनुदान बंद करा; अन्यथा घरी बसण्याची तयारी ठेवा, असा थेट इशारा भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी शनिवारच्या कुडचडे येथील सभेत राज्य सरकारला दिला. भाषा समर्थकांचा बालेकिल्ला असलेल्या कुडचडेतील सभेलाही प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. विशेष म्हणजे माजी आमदार रामराव देसाई व श्याम सातार्डेकर यांनीही उपस्थिती लावून पाठिंबा व्यक्त केला. स्थानिक नगरसेविका अपर्णा प्रभूदेसाई व दाभाळचे सरपंच दीपक पाऊसकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी केलेल्या जोशपूर्ण भाषणात वेलिंगकर म्हणाले, मातृभाषेशी द्रोह करणे म्हणजे प्रत्यक्ष आईशी द्रोह करणे. असे
लोक सिद्धांतहीन असतात. भाजपनेही मातृभाषेशी द्रोह करून आपला तत्त्वहीनपणा दाखवून दिला आहे. अशा वृत्तीच्या या विषवल्लीला मुळापासून उखडून टाकायची वेळ आली आहे. मतदारांना पर्याय नाही,
या भ्रमात राहू नका. जनता लाचार नाही.
ते तुम्हाला योग्य तो धडा शिकवतील,
असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले की, भाजपला वाटते की, मतदारांना पर्याय नसल्यामुळे कुठलाही निर्णय घेतला, तरी आपल्याला कुणी हात लावू शकणार नाही. योजनांचे काही पैसे टाकले म्हणून जनता लाचार होईल,
असे भाजप आमदारांना वाटत असेल,
तर ती त्यांची घोडचूक आहे. जनता सरकारात काही चुकीचे निर्णय घेतल्यामुळे स्वाभिमानी जनतेने अटलबिहारी वाजपेयी
व लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य नेत्यांनाही घरी बसविले होते. त्यापुढे गोव्यातील भाजप आमदारांची पात्रता काय?
गेल्या चार वर्षांत भाजपच्या सर्व २१ आमदारांनी लोकांशी प्रतारणा केली. जर त्यांना आपल्या पापांचे क्षालन करायचे असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन भाजपातून बाहेर पडावे आणि जनआंदोलनात सामील व्हावे. २ आॅक्टोबरला आम्ही (पान ४ वर)

Web Title: One June deadline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.