उसगाव पंचायत क्षेत्रात दोन अपघातात एक ठार ,दोन जखमी
By आप्पा बुवा | Published: June 20, 2024 06:57 PM2024-06-20T18:57:57+5:302024-06-20T19:08:56+5:30
अपघाता नंतर ट्रक चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
फोंडा - उसगाव पंचायत क्षेत्रात गुरुवारी झालेल्या दोन अपघातामध्ये एक जण ठार तर दोघे जण जखमी होण्याची घटना घडली आहे. एक अपघात हा हिट अँड रन प्रकरण आहे.
सविस्तर वृत्तानुसार दुपारी दीडच्या दरम्यान उसगाव नेसले फॅक्टरी जवळ असलेल्या खुरसाकडे या जागी भीषण अपघात झाला. ट्रक क्रमांक (आरजे - 27 - जीबी- 2124)हा भरधाव वेगात मोलेच्या दिशेने निघाला होता. अपघातात मृत्युमुखी झालेला स्थानिक रहिवासी आनंद धर्मा नाईक( वय 57 )हे जवळच्या दुकानात काही खरेदी करण्यासाठी आले होते. खरेदी करून निघत असताना भरधाव मालवाहू ट्रकने त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की मृत झालेल्या नाईक याचे शिर सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आढळून आले. खुरसाकडे जिथे अपघात झाला तिथे सुद्धा त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. सुरुवातीला त्याची ओळख पटवणे सुद्धा कठीण झाले होते.
अपघाता नंतर ट्रक चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ट्रक राष्ट्रीय महामार्गावर पकडला. हिट अँड रन केसच्या प्रकरणी ड्रायव्हर धनानाथ हिरानात जोगी (वय 66 ,राहणार उदयपूर राजस्थान )याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताबद्दल जास्त माहिती देताना तो म्हणाला की उसगाव येथे त्यावेळी मुसळधार पाऊस कोसळत होता .सदर इसम ट्रकच्या खाली आला आहे हे त्याला माहीतच नव्हते. त्यामुळेच आहे त्याच वेगात ट्रक पुढे गेला. अपघात झाल्यानंतर त्याचे शीर ट्रकलाच अडकून राहिले जे नंतर एमआरएफ कंपनी समोर रस्त्यावर पडले होते.
त्याच ठिकाणी झालेल्या दुसऱ्या अन्य एका अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्तानुसार एक मालवाहू टेम्पो चुकीच्या दिशेने आत शिरला. यावेळी उजगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वरांना अचानक वळलेल्या टेम्पो चां अंदाज आला नाही. दुचाकी वरील त्यांचा ताबा गेला व त्यांची दुचाकी थेट टेम्पो चाकाच्या खाली आली.या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. फोंडा पोलीसानी दोन्ही अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.