उजगाव पंचायत क्षेत्रात NIA ची भल्या पहाटे धाड; घरातील एकाची चौकशी
By आप्पा बुवा | Published: September 14, 2023 07:13 PM2023-09-14T19:13:43+5:302023-09-14T19:14:19+5:30
सदर घरातील मुलगा मागच्या काही दिवसापासून नातेवाईकांकडे जातो म्हणून गेला होता
फोंडा
देशविरोधी कारवाया करणाऱ्या घटकाविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन आय ए) सक्रिय झाली असून ह्या मोहिमेचा एक भाग म्हणून व मिळालेल्या भक्कम पुरावाच्या आधारे उसगाव पंचायत क्षेत्रातील एका व्यक्तीच्या घरी भल्या पहाटे धाड घालण्यात आली. गुरुवारी सकाळपासून सदर व्यक्तीच्या घरी एन आय ए चे पथक चौकशी करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार सदर घरातील मुलगा मागच्या काही दिवसापासून नातेवाईकांकडे जातो म्हणून गेला होता. तो परत आल्यानंतर काही दिवसातच एन आय ए पथक त्याच्या घरी पोहोचले आहे. अधिक माहितीनुसार झारखंड मध्ये एका व्यक्तीला देश विरोधी कारवाया करण्याच्या कारणावरून ताब्यात घेतले असता उसगाव येथील सदर व्यक्तीचे कनेक्शन त्याच्याकडे आढळून आले. दोघेही संपर्कात असल्याचे आढळून येताच एन आय ए च्या पथकाने गोवा पोलिसांची संपर्क साधला व गुरुवारी पहाटे त्याच्या घरी धाड घालण्यात आली.
एन.आय.ए.च्या पथकाने पोलिसांसोबत ज्या संशयित मुलाच्या मुलाच्या घरी छापा मारला तो मुलगा अल्पवयीन असून जवळच असलेल्या एका शाळेत दहावीत शिकत आहे. सदर मुलगा वापरत असलेला मोबाईल एन आय ए पथकाने जप्त केला असून तपासासाठी व चौकशीसाठी तो आपल्याबरोबर घेऊन गेले आहेत. छापेमारीत पोलिसांनी नक्की काय गोळा केले याची सविस्तर माहिती जरी मिळालेली नसली तरी सदर मुलाच्या पालकांना व मुलाला अधिक चौकशीसाठी 22 सप्टेंबर रोजी झारखंड येथील बोलविण्यात आले आहे.