गोव्यातील दुधसागर धबधब्यासाठी लवकरच सुरु होणार होणार ऑनलाइन बुकींग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 11:58 AM2017-12-14T11:58:35+5:302017-12-14T11:58:47+5:30
दुधसागर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.
पणजी - दुधसागर धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. दुधसागरला येणाऱ्या पर्यटकांना टँक्सी न मिळाल्यामुळे परत जावे लागत आहे. त्यामुळे ही ऑनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दूधसागर धबधबाजवळ जाण्यासाठी 225 गाड्यांना केवळ परवानगी आहे. परंतु या भागात 431वाहने आहेत त्यांनाही परवानगी देण्यात यावी अशी मागणी मगो पक्षाचे आमदार दीपक पास्कर यांनी केली होती. मागील वर्षी 1.5 लाख पर्यटक येऊन गेले असे पर्यटन खात्याच्या अहवालात म्हटले आहे. दर दिवसा या भागात 3.5 हजार लोक येतात. त्यामुळे अधिक वाहनांना परानगी दिल्यास पर्यटकांचेही सोयीचे ते ठरणार आहे.
गावातील लोकांनाच या भागात परवानगी देण्याचा निर्णय झाला होता असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार पूर्वी 225 व नंतर 431 वाहनांना परवानगी देण्यात आली. परंतु त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की एका एका व्यक्तीच्या चार पाच जीपगाड्या आहेत. काही जण सरकारी नोकर असूनही जीपगाड्या घेऊन धंदा करीत असल्याचे आढळून आले तर काही परराज्यातील लोक येऊन हा धंदा करीत असल्याचे आढळून आले. या लोकांना बाजूला काढून नंतर पुन्हा संख्या 225 वर आणली गेली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.