ऑनलाईन फ्रोड! आधार-पॅन कार्ड लींक करण्याच्या नावाखाली महिलेला २ लाख ३० हजारांची टोपी
By पंकज शेट्ये | Published: May 4, 2023 08:17 PM2023-05-04T20:17:43+5:302023-05-04T20:19:14+5:30
दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.
वास्को : आधार आणि पॅन कार्ड ‘लींक’ करण्याचा शेवटचा दिवस असून पाठवलेले ‘लींक’ डाऊनलोड करून आधार-पॅन कार्ड ‘लींक’ करा असा संदेश अज्ञात आरोपीने टाकून एका महिलेला ‘आॅनलाईन फ्रोड’ द्वारे २ लाख ३० हजार रुपयांना लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला. दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी रात्री त्याप्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला. वेर्णा येथे राहणाऱ्या रिना नामक महीलेला ११ एप्रिलच्या दुपारी अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप वर एक अॅप डाऊनलोड करण्यासाठी लींक पाठवले. आधार - पॅन कार्ड लींक करण्याचा शेवटचा दिवस असून पाठवलेल्या ‘लींक’ वरून अॅप डाऊनलोड करा आणि आधार - पॅन कार्ड ‘लींक’ करा असा संदेश अज्ञाताने आरोपीने महीलेला टाकला. अज्ञात आरोपीने टाकलेल्या संदेशानुसार खरोखरच आधार - पॅन कार्ड ‘लींक’ करण्याचा शेवटचा दिवस असल्याचे महीलेला वाटल्याने तिने ‘लींक’ वरून ते अॅप डाऊनलोड केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार महीलेने डाऊनलोड केलेले ते अॅप एका बँकेचे होते. त्यानंतर महीलेने त्या अॅपमध्ये स्व:ताच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि स्व:ताच्या बँक खात्याची माहीती घातली.
महीलेने अॅपमध्ये माहीती घातल्यानंतर काही वेळातच तिच्या बॅक खात्यातून २ लाख ३० हजाराची रक्कम अज्ञात आरोपीने वटवल्याची माहीती पोलीसांनी दिली. आॅनलाई फ्रोड करून वेर्णा भागात राहणाऱ्या महीलेला २ लाख ३० हजार रुपयांना टोपी घातलेल्या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा नोंद केला असून वेर्णा पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.