गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 02:27 PM2017-10-06T14:27:38+5:302017-10-06T14:27:57+5:30

गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

Online registration for the International Film Festival of Goa begins | गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

Next

पणजी - गोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 20 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे. यंदा फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असल्याने देशभरातून या महोत्सवात विद्यार्थ्यांचा समावेश होईल, असं दिसतं आहे. गोवा मनोरंजन सोसायटीच्या (ईएसजी) आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट महोत्सव होत आहे. मनोरंजन संस्था आणि आयनॉक्स यांच्या करारानुसार त्यांच्या थिएटरमध्ये चालणारा या महोत्सवाचे पुढील वर्ष 2018 शेवटचे असणार आहे. 2019 मध्ये 50 वा चित्रपट महोत्सव दोनापावल येथे राज्य सरकारच्या नव्या संकुलात होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी केली आहे. या मल्टीप्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये हॉटेलसह सर्व सुविधी असणार आहेत.

गतवर्षी 2016 मध्ये 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सात हजारांच्या आसपास प्रतिनिधी नोंदणी झाली होती. यावर्षी प्रतिनिधी नोंदणी नऊ हजारांर्पयत जाईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे. 

यावर्षी काही चित्रपटांना झालेली गर्दी पाहता आणि थिएटरमधील आसनक्षमता पाहता आयोजकांना रात्री उशिराचा खास शो दाखवावा लागला होता. यंदा जर प्रतिनिधींची संख्या वाढणार असेल, तर पुन्हा हाच कित्ता गिरवावा लागण्याची शक्यता आहे. ज्या चित्रपटांना गर्दी होते, त्यांना अधिक आसन क्षमतेची थिएटर उपलब्ध करून देणो गरजेचे आहे. यंदा नियोजनासाठी स्थायी व आढावा समितीची नेमणूक केल्याने हा प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल, असे वाटते. महोत्सवात काही प्रतिनिधी तिकीट काढूनही चित्रपटांना येत नाहीत, अशा प्रतिनिधीने तीनवेळा जर आपले तिकीट वाया घालविले, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची किंवा प्रसंगी त्याचे प्रतिनिधीत्व बाद ठरविण्यावरही समिती विचार करीत आहे. 

दोन्ही समितीवर जबाबदारी
स्थायी समितीमध्ये जहातू बरुआ, पियुष पांडे, नागेश कुकूनूर, रॉय कपूर, प्रसून जोशी, नीना गुप्ता, अजित सरकार, आनंद गांधी यांचा समावेश आहे. त्यामुळे या समितीवर दरवर्षी चित्रपटाच्या शोवेळी प्रतिनिधींना प्रवेश न मिळाल्याने होणाऱ्या गोंधळावर काही उपाय योजण्याची जबाबदारी आहे. आढावा समितीमध्ये विवेक अग्निहोत्री, अनिरुद्ध रॉय, ऋषिता भट, पल्लवी जोशी, खालीद महमूद, भास्कर हजारिका, सैबल चटर्जी, भावना सोमय्या यांचा समावेश आहे. या समिती महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेऊन केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत.
 

Web Title: Online registration for the International Film Festival of Goa begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.