इफ्फीला फक्त १७ दिवस शिल्लक, तयारीची लगबग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 03:13 PM2023-11-03T15:13:21+5:302023-11-03T15:13:53+5:30
गोवा मनोरंजन संस्थेतर्फे इफ्फीची इतर तयारीही केली जात आहे.
नारायण गावस -
पणजी : गोव्यात हाेणाऱ्या ५४ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फक्त १८ दिवस शिल्लक राहिल्याने आयोजकांतर्फे जाेरात तयारी सुरु आहे. इफ्फीचे प्रमुख ठिकाणी असलेल्या गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारात आता मंडपही घालायला सुरुवात झाली आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्थेतर्फे इफ्फीची इतर तयारीही केली जात आहे.
यंदाचा हा ५४ वा आंतराष्ट्रीय चित्रपट महाेत्सव २० ते २८ नोव्हेंबर असे ८ दिवस हाेणार असून यात देश विदेशातील कलाकार तसेच चित्रपट अभ्यासक, चित्रपट प्रेमी यांची प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. प्रतिनिधी नाेंदणीही सुरु झाली असून हजारो प्रतिनिधींनी नाेंदणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंतही गाेवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेत आहेत. यंदाचा इप्फी चांगल्या माेठ्या प्रमाणात व्हावा यासाठी तयारी सुरु झाली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी २००४ मध्ये गाेव्यात पहील्या इफ्फीला सुरुवात केली नंतर हा महोत्सव गेली १९ वर्षे गोव्यात सुरु आहे. यंदाचा हा २० वा महोत्सव गाेव्यात हाेत आहे. इफ्फी महोत्सवात गाेव्यात कायमस्वरुपी करण्यात आला आहे. मागील काही वर्षापासून इफ्फीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशविदेशातील विविध कलाकार या महोत्सवानिमित्त गोव्यात असणार आहे. यासाठी पणजी राजधानी सजविली जात आहे.
सध्या माेजकेच दिवस शिल्लक असल्याने गाेवा मनोरंजन संस्थेच्या आवारात मंडप घालण्याचा सुरुवात केली आहे. प प्रतिनिधी नोंदणीही जाेरात सुरु आहे. तसेच इतर आयोजनाचे कामही केले जात आहे.