संवेदनशील असाल तरच दिग्दर्शक बनू शकता : कृती सनॉन
By संदीप आडनाईक | Published: November 24, 2018 06:10 PM2018-11-24T18:10:59+5:302018-11-24T18:13:37+5:30
महिला दिग्दर्शक कायम संवेदनशील असतात असे अनेकजण मानतात, परंतु तुम्ही जर एखाद्याच्या भावनाच समजून घेउ शकत नसाल,
-संदीप आडनाईक
पणजी : महिला दिग्दर्शक कायम संवेदनशील असतात असे अनेकजण मानतात, परंतु तुम्ही जर एखाद्याच्या भावनाच समजून घेउ शकत नसाल, तर तुम्ही कधीच दिग्दर्शक बनू शकत नाही, असे मत मॉडेल-अभिनेत्री कृती सनॉन हिने व्यक्त केले.
येथे सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शनिवारी ती सहभागी झाली होती.
कला अकादमीत आयडंन्टीफाय गेटींग टू नो कृती सनॉन या कार्यक्रमात कृती सेनॉन आणि अभिनेता आदिल हुसेन यांनी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला.
कृती सनॉनने २०१४ साली एका तेलुगू सिनेमामध्ये भूमिका करून अभिनय कारकिदीर्ची सुरुवात करणाºया कृतीने त्याच साली प्रदर्शित झालेल्या हिरोपंती ' चित्रपटामध्ये टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आदिल हुसैनने रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटात अनेक भूमिका साकारलेल्या आहेत. लाइफ आॅफ पाय हा त्याचा गाजलेला आंतरराष्ट्रीय सिनेमा होता. इफ्फी प्रतिनिधींसमोर कृती आणि आदिल यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या कार्यक्रमासाठी इफ्फीतील युवा प्रतिनिधींनी चांगलाच प्रतिसाद दिला.
कृती म्हणाली, अनेकदा आपण अनेक गोष्टींपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो. आपण असा विचार करतो, की ते आपल्यासाठी योग्य ठरणार नाही. परंतु आपण तेथे गेले पाहिजे आणि त्याची अनुभूती घेतली पाहिजे, असे मला वाटते. दुसºया एका प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, की माझ्यापुढेही कधी कधी पुढे काय असा प्रश्न पडतो. पण मी नेहमी स्वत:ला विचारते, की माझ्या चित्रपटातील पात्रे मला भेटण्यासाठी सातत्याने संवेदनश्ीलता जपली पाहिजे. त्यांच्या भावनाच त्यातून मी मांडत असते, शिवाय माझ्याही भावनांना त्यातून वाट मिळत असते.
आदिल हुसेन म्हणाला, अभिनेता म्हणून काम करताना सर्व गोष्टींना तुम्हाला सामोरे जावेच लागते. तुम्ही जर मुंबईत असाल तर तुमचा कोणत्याही भूमिकेसाठी विचार केला जाउ श्कतो, पण तुम्ही नॉर्वेमध्ये असाल तरीही तुमच्यासाठी अभिनयाची कवाडे खुलीच राहतील. फक्त ती तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजेत, असेही मिश्किलपणे तो हळूच म्हणाला.
सर्वबाजूंनी तुमच्यावर काहीतरी आक्रमण होत असताना शांतपणे त्या त्रास देणाºया गोष्टी शौचालयात बुडवून टाका. माझी सृजनशीलतेची देवता आणि काम याकडे मी मला सोपवतो. एका प्रश्नाला उत्तर देताना आदिल म्हणाला,की माझ्या महिला दिग्दर्शकासोबत सेटवर काम करताना दडपण येते.आमच्यात कायम पडदा राहतो,अशी कबुली त्याने दिली.