तंबाखू विरोधी सिनेमांच्या महोत्सवाचे ३१ मे रोजी उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 09:17 PM2018-04-18T21:17:00+5:302018-04-18T21:17:00+5:30
गोवा दंत महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग व गोवा मनोरंजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे रोजी दुस-या तुंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पणजी - गोवा दंत महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग व गोवा मनोरंजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे रोजी दुस-या तुंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव गोवा व राष्ट्रीय अशा दोन विभागात होणार असून चित्रपट महोत्सव स्पर्धेसाठी नोंदमी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ एप्रिल अहे अशी माहिती मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेती दिली.
या वेळी गोवा दंत महाविद्यालयाच्या डॉ अमिता केंकरे कामत आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी जाहिरात चित्रपच न लघुपट असे दोन विभाग आहेत. गोवा विभागात अर्ज भरण्.ासाठी चित्रपट मराठी, कोंकणी, हिंदी, किंवा इंग्रजी भाषेत असणे आवश्यक आहे. चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शक हा गोव्यातीलच असणे सक्तीचे आहे. जाहीरात चित्रपट २ मिनीटांपेक्षा अधीक असू नये तर लघुपट ५ ते १० मिनिटांचा असावा. पात्र असलेल्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर ३० एप्रिल पर्यंत अर्ज भरल्यानंतर १५ मे पर्यंत चित्रपटाची अन्य कागदपत्रे संस्थेकडे जमा करावी लागले असे तालक यांनी सांगितले.
गोवा विभागातील जाहीरात चित्रपट व लघुपट विभागातील चित्रपटासाठी प्रत्येकी प्रथम क्रमांक ५० हजार रूपये व द्वितीय क्रमांकाचे ३० हजार रूपये असे बक्षिसचे स्वरूप आहे. राष्ट्रीय विभागात जाहीरात चित्रपट व वघुपट विभागात प्रत्येकी प्रथम १ लाख रूपये तर द्वितीय क्रमांकाचे ५० हजार रूपये बक्षिसाचे स्वरूप आहे.
महोत्सवाचे उद्घाटन व स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम ३१ मे पोजी होईल. तंबाखुचे दुष्परिणामांविषयी जागरूकता पसरविण्यासाठी बक्षिस प्राप्त जाहीरात चित्रपट हे टीव्ही, चित्रपटगृह, चॅनल्सवर दाखविण्यात येईल. तसेच शाळा , महाविद्यालय व सरकारी खात्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करून हे चित्रपट दाखविण्यात येईल अशी माहिती डॉ केंकरे कामत यांनी दिली.
राज्यात तंबाखु सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे रूग्ण वाढत आहे. तंबाखु सेवनामुळे २०१६-१७ दरम्यान ९० रूग्ण आढळले होते यात वाढ होऊन २०१७ ते आतापर्यंतच १२० रूग्णांना आजार बळावला आहे. दरवर्षी धुम्रपानामुळे जीव जाणाºयांची संख्या देखील वाढत असल्याचे डॉ केंकरे कामत यांनी सांगितले.