सरकारी मराठी अकादमीचे मंगळवारी उद्घाटन
By admin | Published: May 21, 2016 03:36 AM2016-05-21T03:36:57+5:302016-05-21T03:37:16+5:30
पणजी : गोवा सरकारी मराठी अकादमी ही सर्वसमावेशक आणि मराठी संस्कृती जपण्यासाठीची चळवळ ठरेल, असे अकादमीचे
पणजी : गोवा सरकारी मराठी अकादमी ही सर्वसमावेशक आणि मराठी संस्कृती जपण्यासाठीची चळवळ ठरेल, असे अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी सांगितले. मंगळवर, २४ रोजी नवीन मराठी अकादमीचे उद्घाटन कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.
अनिल सामंत म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा भाषिक द्वेष नसलेली, सर्व भारतीय भाषांचा सन्मान करणारी आणि त्याचवेळी मराठीसाठी वाहून घेतलेली संस्था, असे स्वरू प मराठी अकादमीचे आहे. अकादमीच्या घटनेतच तशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातही अकादमीच्या मूल्यांचा ढाचा कायम राहून ती दिशा भरकटणार नाही, अशी व्यवस्था आहे. ‘मैत्र जिवांचे’ हे नवीन अकादमीचे घोषवाक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यात ९ मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. प्राचार्य गोपाळराव मयेकर, प्रसाद सावकार, पं. सोमनाथबुवा च्यारी, रामकृष्ण नायक, रमाकांत पायाजी, पु. शि. नार्वेकर, भिकू पै आंगले, जयराम कामत आणि ह. भ. प. नारायणबुवा बर्वे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला ‘मराठी ऊर्जा गीते’ हा कार्यक्रम
होणार असून त्यात डॉ. प्रवीण गावकर, अक्षय नाईक आणि ऋतिष्का वेर्णेकर या कलाकारांचे गायन होणार
आहे.
२४ मे रोजी कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे.
(प्रतिनिधी)