गोमेकॉत कॅन्सर रुग्णांसाठी ओपीडी सुरू, अवयव रोपणास मणिपालला मान्यता नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:18 PM2018-04-20T22:18:14+5:302018-04-20T22:18:14+5:30
दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाला अवयव रोपणासाठी आरोग्य खात्याने मान्यता नाकारली आहे. यापुढे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातच(गोमेकॉ) अवयव दान व अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होतील अशी भूमिका सरकारने घेतली आहे.
पणजी - दोनापावल येथील मणिपाल इस्पितळाला अवयव रोपणासाठी आरोग्य खात्याने मान्यता नाकारली आहे. यापुढे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळातच(गोमेकॉ) अवयव दान व अवयव रोपणाच्या शस्त्रक्रिया होतील अशी भूमिका सरकारने घेतली आहे. आरोग्य सचिव अशोक कुमार यांनी यापूर्वी मणिपाल इस्पितळाला अवयव दान व रोपणाबाबतची परवानगी परस्पर देऊन टाकली असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांचे म्हणणो असून राणो यांनी या प्रकरणी आरोग्य सचिवांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सरकारच्या गोमेकॉ इस्पितळात आठवडय़ाला दोनवेळा कॅन्सर रुग्णांसाठी ओपीडी सुरू करण्यात आली असून केएलईचे डॉक्टर गोमेकॉत उपलब्ध राहून रुग्णांना तपासणार आहेत.
मणिपाल इस्पितळाने अवयव दान व रोपणासाठीच्या प्रक्रियेसाठी सरकारची परवानगी मागितली होती. मात्र सरकारने ही परवानगी नाकारली असल्याचे मंत्री राणो यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. वास्कोतील ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव घेण्याची प्रक्रिया गेल्या महिन्यात मणिपालमध्ये केली गेली. मात्र मुंबईतील ग्लोबल इस्पितळाच्या डॉक्टरांनी ही प्रक्रिया गोमेकॉ इस्पितळात रुग्णाला नेऊन तिथे करायला हवी होती, कारण मणिपाल इस्पितळाला परवानगी नाही असे मंत्री राणो यांचे म्हणणो आहे. त्या दिवशी आरोग्य सचिव अशोक कुमार यांनी दोन तासांत मणिपालमध्येच प्रक्रिया करण्यास परवानगी कशी काय दिली याची चौकशी सुरू झाली असल्याचे ते म्हणाले. आरोग्य सचिवांची भूमिका तपासली जाईल, कारण एकतर्फी मान्यता देऊन टाकण्याचा आरोग्य सचिवांना अधिकारच नाही, कुठच्याच अधिका:याला तसा अधिकार नसतो, असे त्यांनी सांगितले. येत्या 3क् दिवसांत स्टेट ऑर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लान्ट (सोटो) संस्था स्थापन करण्यास आपण गोमेकॉच्या डीनना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.
कॅन्सर रुग्णांसाठी ओपीडी (चौकट)
दरम्यान, बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात कॅन्सर रुग्णांसाठी शुक्रवारपासून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू झाली आहे. पूर्ण दर्जाचा बर्न्स युनिट व प्लॅस्टीक सजर्री विभाग याचेही आरोग्य मंत्री राणो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकांचा जीव वाचविण्यासाठी हे दोन्ही विभाग उपयुक्त ठरतील, असे राणो म्हणाले. या विभागात डॉक्टर्स, परिचारिका व अन्य मनुष्यबळ कायम असेल. गोमेकॉ इस्पितळ आम्ही मजबूत करत आहोत. विभागीय कॅन्सर सेंटर गोमेकॉत स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू आहे, असे मंत्री राणो यांनी सांगितले. कॅन्सर ओपीडी बुधवारी व शुक्रवारी गोमेकॉत सुरू राहील.
यावेळी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नाडिस, डीन प्रदीप नाईक, वैद्यकीय अधीक्षक शिवानंद बांदोकर, बर्न्स विभागाचे प्रमुख डॉ. युरी आंबोरकर आदी उपस्थित होते.