गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला; विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:30 PM2020-06-20T16:30:21+5:302020-06-20T16:30:28+5:30

गोव्यातील सरकार सोहळ्यातच मग्न

Opponents have questioned law and order in Goa | गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला; विरोधकांचा आरोप

गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला; विरोधकांचा आरोप

Next

मडगाव: सांताक्रुझ येथे झालेल्या गँगवोरात एकाचा खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी गोवा सरकारवर टीकेचा झोड उठविला असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोहोचल्याचा आरोप केला आहे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत  यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अर्थव्यवस्था कोसळल्याने सामान्य माणसाचे कंबरडे आधीच मोडलेले आहे तशातच आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे असे म्हटले आहे.दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्ड पक्षानेही सरकारवर टीका करताना या सरकारला गोवा दुसरा उत्तर प्रदेश बनवायचा आहे का असा सवाल या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कामत म्हणाले, एका बाजूने गोवेकरांची सुरक्षा धोक्यात असताना दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने गोव्यातील भाजप सरकार सोहळे साजरे करण्यात मग्न आहे. भाजपाने आता या ' व्हर्चुअल जगातून'  बाहेर येऊन गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गोव्यात वाढणारी गुन्हेगारी, ड्रग व्यवसाय, वेश्या व्यवसाय, खून याबद्दल आम्ही सरकारला वारंवार सतर्क करण्याचे काम केले मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही वेळ आल्याचे कामत म्हणाले.

दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपल्या ट्विट मध्ये सरकारला लक्ष्य करताना गँगवोर, सुपारी हत्या, खंडणी असे प्रकार गोव्यात हळूहळू वाढू लागले आहेत. गोव्याला मुख्य धारेत आणायचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा हाच प्रयत्न का असा सवाल करीत गोव्याला दुसरा उत्तर प्रदेश बनवायचा आहे का असे विचारले आहे. आम्ही ते होऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Opponents have questioned law and order in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.