गिरीतील माड कापण्यास विरोध

By admin | Published: May 23, 2017 01:55 AM2017-05-23T01:55:22+5:302017-05-23T01:55:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कबार्देस : म्हापसा-पणजी हमरस्त्याच्या रुंदीकरणासाठी गिरी क्रॉस ते पर्वरी जुना बाजारपर्यंतच्या परिसरातील नारळाची झाडे कापण्यास

Opposite to cut off the fall | गिरीतील माड कापण्यास विरोध

गिरीतील माड कापण्यास विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बार्देस : म्हापसा-पणजी हमरस्त्याच्या रुंदीकरणासाठी गिरी क्रॉस ते पर्वरी जुना बाजारपर्यंतच्या परिसरातील नारळाची झाडे कापण्यास तीव्र विरोध करीत विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी निदर्शने केली. या वेळी स्थानिकांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला.
गोंय, गोंयकारपणाचा नारा देत सत्तेत असलेल्या सरकारला या वेळी नारळांची झाडे वाचविण्याचे आवाहन करण्यात आले. नारळाच्या झाडाला राज्याचे झाड म्हणून मान्यता देण्याचे आश्वासन गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा तथा विद्यमान मंत्री विजय सरदेसाई यांनी निवडणूक प्रचार काळात दिली होती. त्या गोष्टीची जाणीव ठेवून गिरी येथील माडांची झाडे कापण्यापासून वाचविण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले.
हमरस्ता वाढवायचाच असेल, तर सध्याची झाडे मधोमध एका रांगेत ठेवून डाव्या अथवा उजव्या बाजूने नवीन रस्ता करावा. तसे निवेदन लवकरच सरकारला सादर केले जाणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
या निदर्शनात प्रज्वल साखरदांडे, प्रसाद पानकर, श्रद्धा खलप, मनोज परब, मायकल डिसोझा, स्वप्नेश शिर्लीकर, साईश घाटवळ व एडविन पिंटो या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या आंदोलनाला स्थानिकांचा पाठिंबा मिळाल्याचे कपिल कोरगावकर यांनी सांगितले.

Web Title: Opposite to cut off the fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.