गोव्यात कॅसिनो जुगारप्रश्नी सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 03:17 PM2019-12-05T15:17:50+5:302019-12-05T15:19:31+5:30

मांडवी नदीत सध्या सहा कॅसिनो जहाजे आहेत. देश- विदेशातून पर्यटक पणजीत येतात व कॅसिनोवर जाऊन तिथे जुगार खेळतात.

Opposition Against Casino Gambling Question Government In Goa | गोव्यात कॅसिनो जुगारप्रश्नी सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक

गोव्यात कॅसिनो जुगारप्रश्नी सरकारविरुद्ध विरोधक आक्रमक

Next

पणजी: गोव्यातील मांडवी नदीत पणजीच्या दिशेने असलेली सहापैकी तीन कॅसिनो जहाजे पणजीच्या दिशेने न ठेवता ती पलिकडे बेती-वेरेच्या दिशेने नेण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विरोधी आमदार सरकारवर तुटून पडले आहेत. बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी वेरेच्याबाजूने एक तरी कॅसिनो जहाज नेले जाईलच असा चंग बांधल्यानंतर आमदार रोहन खंवटे, जयेश साळगावकर व इतरांनी लोबो यांना टीकेचे लक्ष्य बनविले आहे.

मांडवी नदीत सध्या सहा कॅसिनो जहाजे आहेत. देश- विदेशातून पर्यटक पणजीत येतात व कॅसिनोवर जाऊन तिथे जुगार खेळतात. अनेक गोमंतकीयही कॅसिनो जुगाराच्या नादी लागले आहेत. कॅसिनो उद्योग हा गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचा भाग बनलेला आहे, असे सरकारचे व गोवा प्रदेश भाजपचेही म्हणणो आहे. विरोधात असताना कॅसिनोंना विरोध करणारा भाजप आता कॅसिनोचे जोरदार समर्थन करत असल्याचेही लोकांना आढळून येते.

मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे हटवा, अशी मागणी आमदार खंवटे, बाबूश मोन्सेरात आदींनी यापूर्वी केली. मात्र ही जहाजे मांडवी नदीतून हटविण्याऐवजी ती जहाजे वेरेच्याबाजूने नेण्याचा सरकारचा विचार आहे. वेरेचा भाग हा आपल्या साळगाव मतदारसंघात येतो, असे आमदार जयेश साळगावकर यांचे म्हणणो आहे व त्यांनी आपण वेरे येथे कॅसिनो जहाजे उभी करू देणार नाही, लोकांसोबत आपण आंदोलन करीन, असा इशारा साळगावकर यांनी दिला आहे.

साळगावच्याबाजूला पर्वरी हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री खंवटे यांनी आपणही लोकांसोबत आंदोलनात उतरीन असे जाहीर केले आहे. वेरे येथे कॅसिनो जहाजे उभी केल्यास मच्छीमारांना त्रस होईल, असे वेरे पंचायतीचे सरपंच विरेंद्र शिरोडकर यांचे म्हणणो आहे. शिरोडकर यांनीही कॅसिनोंना विरोध केला आहे.

दरम्यान, मांडवी नदीतील पणजीच्याबाजूची तीन कॅसिनो जहाजे बाजूला काढून तिथे 110 मीटर लांबीचे मोठे जहाज आणून ठेवले जाऊ शकते, अशी चर्चा विरोधी आमदारांमध्ये सुरू झाली आहे. सरकार मोठे जहाज आणू पाहत आहे काय व त्यासाठी डिल झालेले आहे काय अशी विचारणा जाहीरपणो आमदार खंवटे यांनी केली आहे.

Web Title: Opposition Against Casino Gambling Question Government In Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.