लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची युती होणार? सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:16 AM2023-08-24T09:16:20+5:302023-08-24T09:17:47+5:30

आरजीची एकला चलो मोहीम.

opposition alliance for lok sabha elections 2024 all the parties are fighting for candidacy | लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची युती होणार? सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच

लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची युती होणार? सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः येत्या लोकसभा विरोध पक्षांची युती होणार का? हा प्रश्नच आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स या पक्षांकडून एकच उमेदवार दिला जाणार की कसे? याबाबत उत्सुकता आहे. सद्यस्थितीत रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी त्यांनी निधीही उभा करण्याची तयारी सुरू केली असून त्यांचे कार्यकर्ते लागलेले आहेत.

भाजपचा बैठकांवर जोर

भाजपने लोकसभेसाठी आतापासूनच तयारी चालवली आहे. मंगळवारी पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. येत्या काही दिवसात पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठका गोव्यात लागतील. उत्तर गोवा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे इच्छुक आहेत.

श्रीपाद नाईक यांनाच संधी? 

परंतु कोअर कमिटीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारीची माळ श्रीपाद यांच्याच गळ्यात पडणार आहे. श्रीपाद यांना ही अखेरची तिकीट संधी असेल, असे सांगितले जाते. सलग पाचवेळा खासदार म्हणून निवडून आलेले केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळी तिकीट दिले जाईल की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दक्षिण गोव्यात सावईकर की कवळेकर?

भाजपसाठी दक्षिण गोव्यात माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर व बाबू कवळेकर यांचे नाव चर्चेत आहे. एका गटाकडून आमदार दिगंबर कामत यांचेही नाव पुढे केले जात आहे. पक्षश्रेष्ठी दक्षिणेत नवीन चेहरा देतात की सावईकर यांनाच उमेदवारी दिली जाते हे पहावे लागेल.

काँग्रेसकडे हे इच्छुक

दक्षिण गोव्यात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्याबरोबरच एल्विस गोम्स यांचेही नाव चर्चेत आहे. पक्षाने अखेरच्या क्षणापर्यंत न थांबता उमेदवार लवकर जाहीर करावेत, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षाचे प्रभारी माणिकम टागोर यांच्याकडे केली आहे.

'मगो'च्या मतांची गोळाबेरीज

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मगोप भाजपसोबत नव्हता. यावेळी मगोप राज्यात भाजपसोबत सत्तेत आहे, त्यामुळे मगोपची मते भाजप उमेदवाराला मिळतील. आठ फुटीर काँग्रेसी आमदारही आपली किती मते भाजपकडे वळवतात हे पाहावे लागेल.

भाजपची रणनीती

भाजपची एक रणनीती कायम असते ती म्हणजे निवडणुकीपूर्वी काही पक्षांना ते मॅनेज करतात व मते मिळवतात. दक्षिण गोव्यात चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला असून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. चर्चिल हे आतून भाजपला निकट आहेत. ते रिंगणात उतरल्यास काँग्रेसशी मते फोडतील व त्याचा फायदा भाजपला होईल, अशी भाजपची रणनीती आहे.

गोवा फॉरवर्डचे समान अंतर

गोवा फॉरवर्डने भाजप व काँग्रेसकडे समान अंतर राखले आहे. मध्यंतरी फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आपण राष्ट्रीय पक्षांकडे समान अंतर ठेवून असल्याचे विधान केले होते. आपची भूमिका अस्पष्ट आम आदमी पक्षाने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेचे गोव्यात तसे बळ नाही.

नेते काय म्हणतात?

भाजप उमेदवार पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळ ठरवणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतरच या गोष्टी होतील. कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनात्मक बाबी तसेच राष्ट्रपतींचा दौरा वगैरेंवर चर्चा केली. उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. -  सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

देशात चालू आहे. ही चळवळ गोव्यात कधी पोचते पाहू. मी सुरुवातीपासून 'टीम गोवा' बद्दल बोलत आहेत. गोव्यात विरोधक आहेत, परंतु एकी नाही, हे मान्य करायला हवे. लोकसभेसाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील का? याचे उत्तर एवढ्यात मी देऊ शकत नाही. 'इंडिया' युतीची चळवळ गोव्यात पोचल्यानंतरच यावर भाष्य करता येईल. - विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड

 

Web Title: opposition alliance for lok sabha elections 2024 all the parties are fighting for candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.