विरोधकांनी दोनापावला जेटीवरुन राजकारण करु नये; बाबूश मोन्सेरात यांचे काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:38 PM2023-12-01T16:38:48+5:302023-12-01T16:38:55+5:30
दोनापावला येथील स्थानिक विक्रेत्यांवर कुठलाच अन्याय होऊ देणार नाही. विरोधक हे फक्त राजकारण करण्यासाठी हा विषय वाढवत आहे.
नारायण गावस
पणजी: दोनापावला येथील स्थानिक विक्रेत्यांवर कुठलाच अन्याय होऊ देणार नाही. विरोधक हे फक्त राजकारण करण्यासाठी हा विषय वाढवत आहे. या ठिकाणी कुठल्याच बाहेरील लोकांना व्यावसाय करायला दिला जाणार नाही असे स्पष्टीकरण मंत्री बाबूश माेन्सेरात यांनी दिले.
दाेनापावला जेटीवरुन विरोधकांनी राजकारण करु नये राजकारण केले तर स्थानिक विक्रेत्यांचा प्रश्न सुटणार नाही. आम्ही या स्थानिक विक्रेत्यांसोबत आहोत. ही गेट आहे ती पर्यटन खात्याने घातली आहे.
या ठिकाणी महसुल मिळत असल्याने ती लावण्यात आली आहे. ती आम्ही हटवू शकत नाही पण इतर ज्या स्थानिक विक्रेत्यांच्या समस्या आहेत त्या लवकरच सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मंत्री बाबूे मोन्सेरात यांनी सांगितले.