सिंधुदुर्गातील लोकांना मोपावर नोकऱ्या देण्यास विरोध; गोवा फॉरवर्डचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:22 PM2023-03-09T13:22:22+5:302023-03-09T13:24:41+5:30

गोव्यातील मोपा विमानतळावर सिंधुदुर्गातील लोकांना नोकऱ्या मिळण्यासाठी सिंधुदुर्ग भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली?

opposition to giving jobs to the people of sindhudurg goa forward strike warning | सिंधुदुर्गातील लोकांना मोपावर नोकऱ्या देण्यास विरोध; गोवा फॉरवर्डचा आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्गातील लोकांना मोपावर नोकऱ्या देण्यास विरोध; गोवा फॉरवर्डचा आंदोलनाचा इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मोपा विमानतळावर सिंधुदुर्गातील लोकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी धडपड सुरू आहे. सिंधुदुर्ग भाजपच्या शिष्टमंडळाने यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांनी पत्रकार परिषदेत केला. विमानतळावर नोकरीत पेडणे येथील युवकांना प्राधान्य मिळावे. पेडणेतील युवकांवर अन्याय सहन करणार नाही. प्रसंगी आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.

कळंगुटकर म्हणाले की, 'विमानतळावर स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. टॅक्सी पेडणेबाहेरील लोकांच्या आहेत. विमानतळावर काम करणारे ५० टक्के बाहेरचे आहेत. सिंधुदुर्ग भाजप शिष्टमंडळासोबत पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर होते. ते का गेले याचा आर्लेकरांनी जाब द्यावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: opposition to giving jobs to the people of sindhudurg goa forward strike warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा