हिट अँड रन कायद्याला गोव्यातही विरोध;
By काशिराम म्हांबरे | Published: January 2, 2024 04:40 PM2024-01-02T16:40:58+5:302024-01-02T16:41:42+5:30
राज्यातील शेकडो ट्रक व्यवसायिकांनी कोलवाळ येथे एकत्रीत येऊन नव्या हिट अँण्ड रन कायद्याला विरोध करीत निदर्शने केली.
काशिराम म्हांबरे
म्हापसा: राज्यातील शेकडो ट्रक व्यवसायिकांनी कोलवाळ येथे एकत्रीत येऊन नव्या हिट अँण्ड रन कायद्याला विरोध करीत निदर्शने केली. तसेच आज मध्यरात्रीपासून सुरु होणाºया देशव्यापी बंदात सहभागी होऊन आपला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला.
नवीन दुरुस्ती ट्रक चालकांच्या हिताची नसल्यानेती मागे घेण्याची विनंती निदर्शकांनी केली. या कायद्या विरोधात देशभरातील ट्रक चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदात गोव्यातील ट्रक व्यवसायिक सहभागी होऊन आपले समर्थन देणार असल्याची माहिती व्यवसायिक जोझफ रॉड्रिगीस यांनी दिली.
नव्या कायद्यानुसार हिट अँण्ड रनचा प्रकार घडल्यास १० वर्षाचा कारावास तसेच ७ लाख रुपयांचा दंड देण्याची तरतुद करण्यात आली आहे. त्याला विरोध करताना गरीब ट्रक चालकाला ही रक्कम जमा करणे शक्य होणार नसल्याची माहिती जोझफ रॉड्रिगीस यांनी दिली. गरीब व्यक्तीच चालकाची सेवा करतो. अशी व्यक्ती दंडाची मोठी रक्कम कशी जमा करु शकेल असाही प्रश्न त्यांनी केला. दंडाच्या रक्कमे एवढी रक्कम त्याच्याजवळ असती तर त्यांनी एखादा व्यवसाय सुरु केला असता असेही त्यांनी सांगितले.
अपघात घडल्यानंतर चुकी नसतानाही चालकालाच लोकांकडून मार खावा लागतो. मारहाण टाळण्यासाठी पळून जाणे भाग पडतेअसेराजू वाटिक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच अखिल भारतीय युनीयनाने पुकारलेल्या २४ तसांच्या बंदात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.