...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 08:40 AM2024-01-28T08:40:54+5:302024-01-28T08:41:04+5:30

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली.

otherwise the kamdhenu scheme will be close cm warning | ...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई: भटक्या गुरांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल आता सरकारने घेतली आहे. या गुरांच्या त्रासामुळे सरकार आता गुरे ताब्यात घेणार नाही तर कामधेनू योजनेचा लाभच बंद करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल नाणूस-वाळपई येथील जय श्री राम गोसंवर्धन केंद्राच्या गोशाळेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी उपसभापती नरहरी हळदणकरही उपस्थित होते. कामधेनू योजनेत गेल्या वर्षी बदल करण्यात आले आहेत. मात्र या योजनेअंतर्गत घेतलेली गुरे रस्त्यावर फिरताना आढळतात. त्यामुळे लाभार्थ्यांना होणारा फायदा बंद करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच रस्त्यावर फिरणारे गुरे पशुसंवर्ध खात्यातर्फे जप्त केली जातील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गोशाळेतील ४६० गुरांपैकी बहुतांशी भटकी गुरे असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. तसेच अपघातात जखमी झालेली गुरे व कत्तलखान्यातून सुटका केलेली गुरेही गोशाळेत असल्याचे निदर्शनास आले. सर्व यावेळी मुख्यमंत्र्यांनी पशूपालन करणाऱ्यांना गुरे रस्त्यावर सोडू नका, असे आवाहन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोपूजाही करण्यात आली.

दूध न देणारी जनावरे रस्त्यावर

गोसंवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब म्हणाले की, भटकी जनावरे व्यवस्थापन योजनेनुसार सरकार दररोज १५० रुपये प्रति जनावराचा आहार खर्च देत आहे. ही योजना २०१३ मध्ये अधिसूचित करण्यात आली असली तरी ही ती २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. अनेक वेळा मालक जनावराने दूध देणे बंद केल्यानंतर त्यांना सोडून देते. मात्र या प्राण्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होतो आणि अपघातही होत असतात. 

 

Web Title: otherwise the kamdhenu scheme will be close cm warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.