मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलो...
By admin | Published: September 13, 2014 01:32 AM2014-09-13T01:32:10+5:302014-09-13T01:32:21+5:30
सद्गुरू पाटील ल्ल पणजी तीन दिवस मी उपाशी राहिलो. मुलांसाठी कशीबशी जेवणाची व्यवस्था केली. प्रत्येक टप्प्यावर मरणालाच सामोरे जावे लागले. मृत्यूच्या जबड्यातून कसाबसा बाहेर आलो,
सद्गुरू पाटील ल्ल पणजी
तीन दिवस मी उपाशी राहिलो. मुलांसाठी कशीबशी जेवणाची व्यवस्था केली. प्रत्येक टप्प्यावर मरणालाच सामोरे जावे लागले. मृत्यूच्या जबड्यातून कसाबसा बाहेर आलो, अशा शब्दांत कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी शुक्रवारी अनुभव सांगितला.
जम्मू-काश्मीरमधील महापुरानंतर श्रीनगरमध्ये कुटुंबासह अनेक दिवस अडकून पडलेल्या लोलयेकर यांच्याशी या प्रतिनिधीने शुक्रवारी संवाद साधला. ते म्हणाले, की अत्यंत भयानक अनुभव आला. अनेक दिवस मुलांसह श्रीनगरमध्ये अडकलो. तीन दिवस स्वत: उपाशी राहिलो, पाणीदेखील मिळाले नाही. मुलीसाठी जेवणाची व्यवस्था केली. कुठेच फोन लागत नव्हता. कुणाशीच संपर्क होत नव्हता. कुठे जावे तेही कळत नव्हते. सर्व बाजूंनी आम्ही अडकून पडलो होतो. श्रीनगरमध्ये बॉस्को नामक आणखी एक गोमंतकीय अडकून पडल्याचे मला सांगितले गेले. मात्र, त्या व्यक्तीशीही संपर्क होऊ शकला नाही. कसाबसा माग काढत मी कुटुंबासह बुधवार-गुरुवारी दिल्लीस पोहचलो. त्यानंतर गोव्यात आलो. खरोखर मरण यातना सोसून मरणाच्या दारातून बाहेर आलो. असा अनुभव आयुष्यात कधीच आला नव्हता.