Goa Oxygen leakage : नाशिकनंतर गोव्यात धक्कादायक घटना, रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 05:10 PM2021-05-11T17:10:07+5:302021-05-11T17:13:14+5:30
नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच आता गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच आता गोव्यातील एका जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीचा प्रकार उघडकीस आला आहे. दक्षिण गोव्यातील जिल्ह्या रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. सदर ठिकाणी अग्निशमन दल आणि संबंधित अधिकारी पोहोचले आहेत. अद्याप कोणतीही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. ऑक्सिजन गळती थांबविण्याचा काम युद्धपातळीवर सुरू आहे.
नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजन टँकला मोठी गळती लागली आहे. परिसरात पांढरा धुर पाहायला मिळतोय. ही गळती रोखण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. (Oxygen tank leakage in Goa district hospital)
#WATCH Oxygen tank leakage at South Goa District Hospital; fire tenders rushed to the spot. Details awaited#Goapic.twitter.com/QmDN6JlZ0J
— ANI (@ANI) May 11, 2021
"रुग्णालयाच्या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकमध्ये मोठा बिघाड झालेला नाही. काहीतरी अडचण निर्माण झाली होती इतकं नक्की आहे. पण त्यावर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे आणि परिस्थिती आता पूर्ववत झाली आहे", असं दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी रुचिका कट्याल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालायत एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यात येत हो त्यावेळी ऑक्सिजन लीक झाल्याची घटना घडली. पण घटना मोठी नसून पुढील काही मिनिटांत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे.