पद्मभूषण लक्ष्मण पै यांनी जागविल्या बालपणातील आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 08:00 PM2018-04-06T20:00:00+5:302018-04-06T20:00:00+5:30

प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले जागतिक दर्जाचे गोमंतकीय चित्रकार लक्ष्मण पै यांनी शुक्रवारी मडगावच्या त्यांच्या मुळ वडिलोपार्जित घराला भेट दिली. यावेळी त्यांनी बालपणातील आपल्या मडगावच्या आठवणींनाही उजाळा दिला. मडगावातील आपले शिक्षण, आपले कला शिक्षण त्याचबरोबर आपल्या जुन्या सवंगडय़ांच्या आठवणी त्यांनी जागविल्या.

Padmabhushan Laxman Pai remembered in childhood | पद्मभूषण लक्ष्मण पै यांनी जागविल्या बालपणातील आठवणी

पद्मभूषण लक्ष्मण पै यांनी जागविल्या बालपणातील आठवणी

Next

मडगाव :  प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले जागतिक दर्जाचे गोमंतकीय चित्रकार लक्ष्मण पै यांनी शुक्रवारी मडगावच्या त्यांच्या मुळ वडिलोपार्जित घराला भेट दिली. यावेळी त्यांनी बालपणातील आपल्या मडगावच्या आठवणींनाही उजाळा दिला. मडगावातील आपले शिक्षण, आपले कला शिक्षण त्याचबरोबर आपल्या जुन्या सवंगडय़ांच्या आठवणी त्यांनी जागविल्या.
लक्ष्मण पै यांचे मुळ नाव लक्ष्मण पै फोंडेकर. कोंब-मडगाव येथील फोंडेकर यांच्या वडिलोपार्जित घरात त्यांचा 93 वर्षापूर्वी जन्म झाला होता. नंतर ते मुंबईत जाऊन चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. दुरदर्शनतर्फे त्यांच्यावर एक लघुपट तयार केला जात असून त्याच निमित्ताने त्यांच्या जुन्या घराचे चित्रण करण्यासाठी दूरदर्शनचा क्रू मडगावात आला होता. त्यांच्याबरोबर लक्ष्मण पै हे आपले अमेरिकेत असलेले पुत्र आकाश पै यांच्यासह दाखल झाले होते. विशेष बाब म्हणजे पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या या वडिलोपार्जित घराला दिलेली ही पहिलीच भेट होती.
आपल्या कला शिक्षणाबद्दल सांगताना पै म्हणाले, मडगावातील प्रसिद्ध छायाचित्रकार रामनाथ मावजो  हे माङो मामा. ते जरी छायाचित्रकार असले तरी ब:यापैकी पेंटरही होते. त्यांच्याच स्टुडिओमध्ये मी चित्रकलेकडे आकृष्ट झालो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे प्राथमिक धडे मी गिरवले.
आपल्या शिक्षणाबद्दल सांगताना, पॉप्युलर हायस्कूलमध्ये आपले शिक्षण झाले. गोव्याचे माजी उद्योगमंत्री स्व. बाबू नायक हे व त्यांचे कनिष्ठ बंधु मोहनदास नायक हे आपले त्यावेळचे सवंगडी असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या खेळाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, फुटबॉलसारख्या खेळात आम्हाला तसा फारसा रस नव्हता. त्यावेळी आम्ही विटू दांडू सारख्या देशी खेळातच अधिक रमायचो.
पद्मभूषण पै हे डॉक्युमेंटरीनिमित्त मडगावात आलेले समजल्यावर नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सपत्नीक जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. मडगावचे आमदार दिगंबर कामत हेही यावेळी उपस्थित होते. पै यांचे जुने मित्र हरिश्र्चंद्र नागवेकर हेही यावेळी उपस्थित होते.

Web Title: Padmabhushan Laxman Pai remembered in childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा