पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बिलावल भुत्तो झरदारी गोव्यात
By किशोर कुबल | Published: May 4, 2023 04:17 PM2023-05-04T16:17:11+5:302023-05-04T16:17:43+5:30
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकी निमित्ताने भारत दौरा
किशोर कुबल, पणजी: पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बिलावल भुत्तो झरदारी शांघाय को ॲापरेशन ऑर्गनायझेशनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी दुपारी गोव्यात दाखल झाले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव व चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग हेही गोव्यात आहेत.
He is here in Goa and speaks with clarity of purpose.
— Murtaza Solangi (@murtazasolangi) May 4, 2023
@BBhuttoZardari pic.twitter.com/vdKR8HK1oa
आज ४ आणि उद्या ५ अशा दोन दिवस या बैठका चालणार आहेत. आठ राष्ट्रांचे विदेशमंत्री दोन दिवसीय बैठकीत भाग घेणार आहेत. पाकिस्तान, चीन, रशिया, भारत तसेच मध्य आशियाई राष्ट्रें कझाकस्तान, किर्गिस्तान, ताझिकिस्तान व उझ्बेकीस्तान ही आठ राष्ट्रे शांघाय को-ॲापरेशन ऑर्गनायझेशनची सदस्य आहेत.