पणजी : २०१७ सालची निवडणूक ही निश्चितच भाजपकडून आपल्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री
By admin | Published: May 7, 2015 12:34 AM2015-05-07T00:34:39+5:302015-05-07T00:35:05+5:30
यांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...
लक्ष्मीकांत पार्सेकर
यांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...
ॅ या पुढील म्हणजे २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला किती जागा मिळतील व त्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील?
- माझ्या पक्षाने मला विश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. मी मुख्यमंत्री असल्याने २०१७ची निवडणूक भाजप माझ्याच नेतृत्वाखाली लढवील. भाजपने माझ्याच नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जावे, असा आग्रहही मी पक्षाकडे धरीन. २०१२ साली आम्हाला २१ जागा मिळाल्या. २०१७ साली मी भाजपला निश्चितच २६ ते २७ जागा मिळवून देईन. मला तेवढा विश्वास आहे. आमचे लक्ष्य ३१ जागा मिळविण्याचे असेल. मगो किंवा अन्य कोणता पक्ष त्या वेळी आमच्यासोबत असेल की नाही, यावर मी भाष्य करत नाही; पण पुढील अडीच वर्षांत आयटी प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक सिटी, गुंतवणूक मंडळासमोर येणारे प्रस्ताव अशा मार्गांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील. मी अडीच वर्षांत भरीव काम करून दाखवीन. अलीकडेच आम्ही ३८ प्रकल्प मंजूर केले. त्यातून सहा हजार रोजगार संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्याही अत्यंत चांगल्या विमा व अन्य योजना येत आहेत. भाजपला २०१२ सालापेक्षाही २०१७ साली जास्त जागा मी मिळवून देईन. त्यासाठी रक्ताचे पाणी करीन.
ॅ गेल्या सहा महिन्यांत तुमच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकहितासाठी काय केले?
- २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यात प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ती निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली नव्हती. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळी भाजप लढला होता. मी त्या वेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपला बहुमत मिळाले, तर पर्रीकर सीएम बनतील, असे त्या वेळी पक्षाने अगोदरच ठरविले होते. पर्रीकर यांना केंद्रात जावे लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे मुख्यमंत्रिपद आले. कोणतेही लॉबिंग न करता किंवा दिल्लीत जाऊन कुणाकडे मुख्यमंत्रिपद न मागता माझ्याकडे पक्षाने मोठ्या विश्वासाने व जबाबदारीने हे पद सोपविले. भाजपने निवडणुकीवेळी जाहीरनाम्यातून जी आश्वासने दिली होती, त्यापैकी काही आश्वासने अडीच वर्षांच्या कालावधीत पर्रीकर सरकारने मार्गी लावली. उर्वरित ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या, त्या पुढे नेणे हे माझे काम आहे. गेल्या अर्थसंकल्पातून मी पूर्वीच्या काही योजनांमध्ये सुधारणा केल्या. काही घोषणा व योजनांना नव्या गोष्टी जोडल्या. माझ्या पक्षाने जनतेला निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने मी पूर्णत्वास नेत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही होत आहेत.पणजी : २०१७ सालची निवडणूक ही निश्चितच भाजपकडून आपल्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर
यांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...
ॅ या पुढील म्हणजे २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला किती जागा मिळतील व त्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील?
- माझ्या पक्षाने मला विश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. मी मुख्यमंत्री असल्याने २०१७ची निवडणूक भाजप माझ्याच नेतृत्वाखाली लढवील. भाजपने माझ्याच नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जावे, असा आग्रहही मी पक्षाकडे धरीन. २०१२ साली आम्हाला २१ जागा मिळाल्या. २०१७ साली मी भाजपला निश्चितच २६ ते २७ जागा मिळवून देईन. मला तेवढा विश्वास आहे. आमचे लक्ष्य ३१ जागा मिळविण्याचे असेल. मगो किंवा अन्य कोणता पक्ष त्या वेळी आमच्यासोबत असेल की नाही, यावर मी भाष्य करत नाही; पण पुढील अडीच वर्षांत आयटी प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक सिटी, गुंतवणूक मंडळासमोर येणारे प्रस्ताव अशा मार्गांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील. मी अडीच वर्षांत भरीव काम करून दाखवीन. अलीकडेच आम्ही ३८ प्रकल्प मंजूर केले. त्यातून सहा हजार रोजगार संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्याही अत्यंत चांगल्या विमा व अन्य योजना येत आहेत. भाजपला २०१२ सालापेक्षाही २०१७ साली जास्त जागा मी मिळवून देईन. त्यासाठी रक्ताचे पाणी करीन.
ॅ गेल्या सहा महिन्यांत तुमच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकहितासाठी काय केले?
- २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यात प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ती निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली नव्हती. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळी भाजप लढला होता. मी त्या वेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपला बहुमत मिळाले, तर पर्रीकर सीएम बनतील, असे त्या वेळी पक्षाने अगोदरच ठरविले होते. पर्रीकर यांना केंद्रात जावे लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे मुख्यमंत्रिपद आले. कोणतेही लॉबिंग न करता किंवा दिल्लीत जाऊन कुणाकडे मुख्यमंत्रिपद न मागता माझ्याकडे पक्षाने मोठ्या विश्वासाने व जबाबदारीने हे पद सोपविले. भाजपने निवडणुकीवेळी जाहीरनाम्यातून जी आश्वासने दिली होती, त्यापैकी काही आश्वासने अडीच वर्षांच्या कालावधीत पर्रीकर सरकारने मार्गी लावली. उर्वरित ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या, त्या पुढे नेणे हे माझे काम आहे. गेल्या अर्थसंकल्पातून मी पूर्वीच्या काही योजनांमध्ये सुधारणा केल्या. काही घोषणा व योजनांना नव्या गोष्टी जोडल्या. माझ्या पक्षाने जनतेला निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने मी पूर्णत्वास नेत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही होत आहेत.