खवय्यांसाठी पणजीत मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 01:41 AM2017-05-11T01:41:26+5:302017-05-11T01:42:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी (दि. १०) ‘खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सव २०१७’चे उद्घाटन केले. या वेळी पर्यटनमंत्री

Panaji feast for the consumers | खवय्यांसाठी पणजीत मेजवानी

खवय्यांसाठी पणजीत मेजवानी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी (दि. १०) ‘खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सव २०१७’चे उद्घाटन केले. या वेळी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर, जीटीडीसीचे अध्यक्ष नीलेश काब्राल, महापौर सुरेंद्र फुर्तादो, पर्यटन संचालक मेनिनो डिसोझा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
येथील दयानंद बांदोडकर मैदानात रविवार, दि. १४ पर्यंत
हा महोत्सव सुरू राहील. दरवर्षीप्रमाणे या महोत्सवात भरपूर मनोरंजन, गोव्याचे अस्सल खाद्यपदार्थ आणि पेयांचा आस्वाद घेण्याची संधी देणारे ६० स्टॉल्स सहभागी झाले आहेत.
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात प्रसिद्ध राष्ट्रीय बॅँड्स कला
सादर करतील. त्याचप्रमाणे गोमंतकीय कलाकारही सर्वोत्तम लोकसंगीत व लोककलेची अनुभूती देतील.
या वेळी पर्रीकर म्हणाले, दरवर्षी गोवा टुरिझमतर्फे या अभिनव महोत्सवाचे खास आयोजन केले जाते. गोमंतकीय खाद्यपदार्थ आणि संस्कृतीला एकाच व्यासपीठावर आणण्याचा हेतू त्यामागे असतो.
प्रचंड उत्साह आणि कलाकार, सादरकर्ते, पर्यटन क्षेत्रातील भागधारक व पर्यटकांच्या लक्षणीय सहभागाने दरवर्षी हा महोत्सव आणखी विकसित होतना पाहणे प्रोत्साहनकारक
आहे.
पर्यटनमंत्री आजगावकर म्हणाले, नुकत्याच ग्रेप्स एस्केपेडला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर गोवा खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सव २०१७ मध्येही पर्यटक व स्थानिकांसाठी खाद्यपदार्थ, मनोरंजन व संगीताचा सुरेख मेळ घालण्यात आला आहे. पर्यटनमंत्री या नात्याने गोव्याचे विविध पैलू समोर येतील अशा प्रकारे अधिकाधिक महोत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मी उत्सुक आहे.
जीटीडीसीचे अध्यक्ष नीलेश काब्राल म्हणाले, एकाच छताखाली गोव्याची संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी जीटीडीसीतर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आज गुरुवारी (दि. ११) आघाडीचा बॅँड ‘लेस’ संध्याकाळी सात वाजता आपल्या संगीताची अनुभूती देईल, तर रात्री ८.३० वा. गोव्यातील ‘ब्लड’ हा बॅँड रॉक संगीत सादर करेल. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ‘लॉर्ना’ आपली कला सादर करतील व त्यानंतर ‘अंतरिक्ष’ हा दिल्लीचा रॉक बॅँड आपली कला सादर करेल. शनिवारी सायंकळी ७ वाजता ‘द लॅटिन कनेक्शन’च्या संगीतावर ठेका धरता येईल. त्यानंतर मुंबईच्या ‘बॉम्बे बेसमेंट्स’चे सादरीकरण होईल. रविवारी महोत्सवाच्या सांगतासमयी गोव्यातील ‘अल्ट्राट्राझ’ आणि बंगळुरूस्थित ‘लगोरी’ अनुक्रमे सायंकाळी ८.३० वा. कला सादर करतील.

Web Title: Panaji feast for the consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.