पणजीत सात तास वीज गुल; लोकांचे हाल
By Admin | Published: May 18, 2015 01:54 AM2015-05-18T01:54:36+5:302015-05-18T01:54:46+5:30
पणजीत सात तास वीज गुल; लोकांचे हाल
पणजी : कांपाल येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात तातडीचे दुरुस्तीकाम हाती घ्यावे लागल्याने संपूर्ण राजधानी शहर व परिसरात तब्बल सात तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच दुकानदार, व्यावसायिक, पर्यटकांंचे प्रचंड हाल झाले.
शहर बाजारपेठ, महात्मा गांधी मार्ग, दयानंद बांदोडकर मार्ग, हॉटेल मनोशांती परिसर, आकाशवाणी केंद्र, आल्तिनो, टोंक, मिरामार, ला कांपाल परिसरास वीजपुरवठा होऊ शकला नाही. सकाळी ९ वाजता खंडित केलेला वीजपुरवठा दुपारी चार वाजता सुरळीत करण्यात आला. दुरुस्तीसाठी वीज खंडित करण्यात आली खरी; परंतु नागरिकांना त्यामुळे असह्य उकाड्याने हैराण केले. लोकांना घामाच्या धारा लागल्या.
हॉटेल्स, कोल्ड्रिंक्सची दुकाने, तसेच अन्य व्यावसायिकांचा धंदा बुडाला. उन्हाळा असल्याने शीतपेयांना मोठी मागणी असते. मात्र,
खंडित वीजपुरवठ्यामुळे कोल्ड्रिंक्सची दुकाने बंद ठेवावी लागली. (पान २ वर)