पणजी मनपाकडून व्यावसायिकांना विविध कर शुल्क भरण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 02:52 PM2024-03-15T14:52:22+5:302024-03-15T14:52:37+5:30

व्यावसायिक उपक्रम आणि साईनबोर्ड प्रदर्शित करू इच्छिणाऱ्यांनी त्वरीत विहीत नमुन्यातून अर्ज सादर करावा.

Panaji Municipality orders payment of various tax charges to businessmen | पणजी मनपाकडून व्यावसायिकांना विविध कर शुल्क भरण्याचे आदेश

पणजी मनपाकडून व्यावसायिकांना विविध कर शुल्क भरण्याचे आदेश

नारायण गावस

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या क्षेत्रातील इमारतीच्या मालक आणि करदात्यांना विविध परवाना शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत. यात घर पट्टी (कर), व्यवसाय परवाना शुल्क, साईनबोर्ड कर, स्वच्छता शुल्क भरण्याचे आवाहन केले आहे. घर मालक आणि व्यापार आणि व्यवसाय परवानाधारकांनी शुल्क भरतेवेळी त्यांच्या अलीकडील घरपट्टी/व्यापार परवाना पावत्या सादर कराव्यात असेही मनपाने सांगितले आहे. कर शुल्क भरण्याची अंतिम तारीख ३१ जून असू्न त्यानंतर भरल्यास ते व्याज दंड आकारण्यात येईल, असेही मनपाने म्हटले आहे.

घरपट्टी ,साईनबोर्ड कर , व्यापार आणि व्यवसाय कर आणि स्वच्छता शुल्क धनादेश किवा रोख स्वरूपात पणजी महानगरपालिकेच्या कार्यालयात करता येईल. कर ऑनलाईनसुध्दा करता येईल. ऑनलाईन शुल्क भरण्यासाठी www.ccpgoa.com येथे भेट द्यावी असे म्हटले आहे.

व्यावसायिक उपक्रम आणि साईनबोर्ड प्रदर्शित करू इच्छिणाऱ्यांनी त्वरीत विहीत नमुन्यातून अर्ज सादर करावा. जर परवानाधारकाने व्यापार आणि साईनबोर्ड परवान्याचे नूतनीकरण केले नाही तर पणजी महानगरपालिका (सुधारणा) कायदा, २०२२ च्या कलम २४२ ए अनुसार कारवाई प्रक्रिया सुरु केली जाईल. आर्थिक वर्ष समाप्तीमुळे २० मार्च पासून ३१ मार्च २०२४ पर्यंत आर्थिक व्यवहार केले जाणार नाहीत असेही मनपाने म्हटले आहे.

ज्या व्यक्तींनी आपले व्यावसायिक उपक्रम बंद केले आहेत त्यांनी व्यापार परवाना रद्दसाठी १५ मार्च, २०२४ रोजी किंवा आधी लेखी अर्ज करावा आणि त्यांचा व्यापार परवाना परत करावा, तसेच प्रथम व्यापार परवाना आणि घरपट्टी यांची भरावीत.
घरपट्टी भरणाऱ्यांना पुढील व्याज टाळण्यासाठी चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी २० मार्चच्या आधी भरावी असेही सांगितले आहे.

Web Title: Panaji Municipality orders payment of various tax charges to businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.