पणजी, वाळपई पोटनिवडणुकीचे निकाल उद्या; मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या निकालाबाबत उत्कंठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:55 AM2017-08-27T11:55:53+5:302017-08-27T12:13:18+5:30

गोव्यात माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रिंगणात असल्याने प्रतिष्ठेची बनलेल्या आणि गोव्यासह सर्व देशाचे लक्ष लागून रहिलेल्या

Panaji, the results of the Winnipei by-election tomorrow; Looking forward to Chief Minister Manohar Parrikar's findings | पणजी, वाळपई पोटनिवडणुकीचे निकाल उद्या; मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या निकालाबाबत उत्कंठा 

पणजी, वाळपई पोटनिवडणुकीचे निकाल उद्या; मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या निकालाबाबत उत्कंठा 

Next
ठळक मुद्देपणजीत विधानसभा पोटनिवडणुकीचा तसेच वाळपई पोटनिवडणुकीचा निकाल उद्या सोमवारी जाहीर होणार दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपा विरुध्द काँग्रेस अशीच थेट लढत आहे. या निवडणुकीत पर्रीकर आणि विश्वजित यांच्या भवितव्यावर राज्यातील भाजपा सरकारचे भविष्य ठरणार आहे.

पणजी, दि. 27 - गोव्यात माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रिंगणात असल्याने प्रतिष्ठेची बनलेल्या आणि गोव्यासह सर्व देशाचे लक्ष लागून रहिलेल्या पणजीत विधानसभा पोटनिवडणुकीचा तसेच वाळपई पोटनिवडणुकीचा निकाल उद्या सोमवारी जाहीर होणार आहे. 

दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपा विरुध्द काँग्रेस अशीच थेट लढत आहे. या निवडणुकीत पर्रीकर आणि विश्वजित यांच्या भवितव्यावर राज्यातील भाजपा सरकारचे भविष्य ठरणार आहे. पणजीत काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर, गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर व अपक्ष केनेथ सिल्वेरा हेही रिंगणात आहेत. तर वाळपईत काँग्रेसतर्फे रॉय रवी नाईक व अपक्ष रोहिदास सदा गांवकर हेही निवडणूक लढवित आहेत. 

मतमोजणी पणजीत गोमेकॉच्या जुन्या इमारतीत होणार आहे. तेथे स्ट्राँग रुम तयार करण्यात आले असून बुधवारी मतदान संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे या ठिकाणी आणली गेली. तेथे कडक पोलिस पहारा आहे. उद्या सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होईल आणि दोन तासात निकाल अपेक्षित आहेत.

Web Title: Panaji, the results of the Winnipei by-election tomorrow; Looking forward to Chief Minister Manohar Parrikar's findings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.