'स्मार्ट सिटी' कामांच्या विलंबासाठी माफी मागतो: बाबूश मोन्सेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2024 09:45 AM2024-04-08T09:45:12+5:302024-04-08T09:47:01+5:30

३१ मे अखेर कामे पूर्ण होतील, अशी व्यक्त केली अपेक्षा

panaji smart city apologizes for delay in work said babush monserrate | 'स्मार्ट सिटी' कामांच्या विलंबासाठी माफी मागतो: बाबूश मोन्सेरात

'स्मार्ट सिटी' कामांच्या विलंबासाठी माफी मागतो: बाबूश मोन्सेरात

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'स्मार्ट सिटी योजनेची कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने मी माफी मागतो. ३१ मेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे,' असे महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे.

मंत्री मोन्सेरात म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, हे आपल्याला माहीत आहे. या कामांबाबत लोकांच्या सहनशीलतेचे आपल्याला कौतुक आहे. मात्र, त्याचबरोबर ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. कामे पूर्ण होण्यास उशीर होत असल्याने आपण माफी मागतो. ३१ मे या दिलेल्या डेडलाइनमध्ये कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.'

बाबूश म्हणाले की, 'पणजी जुने शहर आहे. नवीन शहर बनवायचे असल्यास कामे त्वरित होतात. मात्र, जुन्या शहराचा विकास करायचा असल्यास जुन्या गोष्टी बाजूला करून विकास करावा लागतो. त्यात वेळ जाणारच. त्यामुळे लोकांना सहन करावे लागते. स्मार्ट सिटीची कामे ही शहरवासीयांच्या फायद्याची तसेच शहराच्या विकासासाठी आहेत हे लोकांना ठाऊक आहे. पणजीवासीयांना या कामांचा त्रास होत असला तरी जेव्हा कामे पूर्ण होतील, तेव्हा ते हा सर्व त्रास विसरतील. कामे लवकर पूर्ण होण्यावर भर दिला जात आहे.'

दरम्यान, या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या प्रदषणामळे नागरिकांना आरोग्याची समस्या जाणवत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी काही नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन या धूळ प्रदूषणाची तसेच एकूणच स्मार्ट सिटीच्या कामांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मागील आठवड्यात पाहणी केली.

 

Web Title: panaji smart city apologizes for delay in work said babush monserrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.