सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचारी एकवटणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 04:20 PM2023-12-04T16:20:04+5:302023-12-04T16:20:29+5:30
सभेत आयटकचे सरचिटणीस कॉम्रेड ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, सुहास नाईक आणि प्रसन्न उटगी उपस्थित राहून कार्यवाहीला मार्गदर्शन करणार आहेत.
उसगाव : अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा रविवारी, दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. पणजी येथील पालिका बागेसमोरील वेलव्होस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आयटक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीची अंमलबजावणी आणि पंचायत कर्मचाऱ्यांना लाभ विषयावर संघटनेच्या सदस्यांमध्ये चर्चा करण्यात येईल. सभेत आयटकचे सरचिटणीस कॉम्रेड ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, सुहास नाईक आणि प्रसन्न उटगी उपस्थित राहून कार्यवाहीला मार्गदर्शन करणार आहेत.
सातव्या वेतनाचे फायदे पंचायत कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी पंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील संघर्षाचा आराखडा तयार करण्यात येईल. सभेत मागील सभेचा अहवाल वाचून मंजूर करण्यात येईल. संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात येईल. गट समिती आणि संघटनेचे पदाधिकारी यांचे कामकाज विषयावर चर्चा करण्यात येईल. पंचायत कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर विचारविनिमय करण्यात येईल.
सभेच्या अध्यक्षांच्या मान्यतेने इतर कोणत्याही बाबीवर चर्चा करण्यात येईल. सभेला राज्यातील सर्व पंचायत कामगार, पदाधिकारी, समिती सदस्य, प्रत्येक पंचायतीतील सर्व संघटनेच्या सदस्यांनी ह्या सभेला आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष नाईक व आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले आहे.