अन्न आणि औषधी प्रशासनाकडून छापा मारून पनीर जप्त
By काशिराम म्हांबरे | Published: July 2, 2024 04:06 PM2024-07-02T16:06:46+5:302024-07-02T16:07:18+5:30
आज मंगळवारी प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, निरीक्षक राजाराम पाटिल तसेच इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
म्हापसा : अन्न आणि औषधी प्रशासनाने म्हापशातील नव्या आंतरराज्य बस स्थानकावर छापा मारून सुमारे ५१० किलो वजनाचा पनीर तसेच खाद्यातील इतर साहित्य जप्त केले आहे.
आज मंगळवारी प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, निरीक्षक राजाराम पाटिल तसेच इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या छाप्यात पनीर व्यतिरिक्त दही तसेच ६० किलो फ्राईज आनियन जप्त करण्यात आले.
खाद्य पदार्थाची वाहतुक करण्यासाठी योग्य प्रकारची काळजी न घेता असुरक्षीत वातावरणात या पदार्थांची वाहतुक केल्याच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. शेजारील राज्यातून आलेल्या प्रवासी बसीतून हे पदार्थ आणण्यात आले होते. मागील अठवड्यात अशा प्रकारची कारवाई प्रशासनाच्या वतिने येथील बस स्थानकावर करण्यात आली होती. या संबंधीचे तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.