पणजीत शहाळे ५० रुपयांना एक; कांदा ६० रुपयांना किलो
By पूजा प्रभूगावकर | Published: October 29, 2023 01:04 PM2023-10-29T13:04:23+5:302023-10-29T13:05:20+5:30
सध्या तरी किंमती कमी होण्याची शक्यता नाही.
पणजी: पावसाळा संपुष्टात आल्याने सध्या उकाडा जाणवत आहे. त्यामुळे शहाळ्यांना मागणी वाढली असून पणजी बाजारात ५० रुपयांना एक या दराने शहाळे मिळत आहे.
यापूर्वी शहाळे ४० रुपये होते. मात्र मागील आठवडयात झालेली नवरात्री तसेच वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे.त्यामुळे थंड शिपेय, शहाळ्यांना मागणी वाढली आहे. गोव्यात महाराष्ट्र व कर्नाटक येथूनही शहाळे येतात. मागणी वाढल्याने त्यांच्या किंमतीत १० रुपयांनी वाढ होऊन ते ५० रुपये झाले आहे. सध्या तरी किंमती कमी होण्याची शक्यता नाही.
दरम्यान शहाळ्यांप्रमाणे आता कांदा सुध्दा महागला आहे. पणजी बाजारात कांदा प्रती किलो ६० ते ६५ रुपये किलो दराने मिळत आहे. तरफलोत्पादन महामंडळाकडे कांदा ५९ रुपये किलो आहे. बेळगाव येथे पडलेल्या परतीच्या पावसाचा फटका कांदा पिकावर झाल्याने त्याचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवसांत दर उतरतील अशी शक्यता भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.