पर्रिकरांचे बोइंग तर काँग्रेसची झुक..झुक गाडी !

By admin | Published: March 12, 2017 10:02 PM2017-03-12T22:02:42+5:302017-03-12T22:02:42+5:30

सरकारी काम आणि सहा महिने थांब.. अशी म्हण आहे. काँग्रेसबाबत ही म्हण परफेक्ट लागू होते. काँग्रेसचे काम आणि कितीही महिने थांबच थांब..

Parrikar's Boeing is Congress Lean ... | पर्रिकरांचे बोइंग तर काँग्रेसची झुक..झुक गाडी !

पर्रिकरांचे बोइंग तर काँग्रेसची झुक..झुक गाडी !

Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 12 -  सरकारी काम आणि सहा महिने थांब.. अशी म्हण आहे. काँग्रेसबाबत ही म्हण परफेक्ट लागू होते. काँग्रेसचे काम आणि कितीही महिने थांबच थांब.. असा अनुभव रविवारी पुन्हा आला. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांचे बोइंग झेपावले तेव्हा काँग्रेसची झुक झुक गाडी स्टार्टच होत नव्हती, अशी स्थिती राहिली. निवडणुकीपूर्वी महायुतीबाबतही काँग्रेसने असा प्रदीर्घ विलंब लावला होता आणि शेवटी महायुती झालीच नाही. ती झाली असती तर आजचे चित्र वेगळे असते; पण कार्यसंस्कृती सुधारेल ती काँग्रेस कसली? भाजपप्रणित आघाडी राज्यपालांकडे गेली, सरकार स्थापनेचा दावा केला, तरीही काँग्रेसमधील काथ्याकूट सुरूच होता. त्यांचा नेता काही ठरेना तेव्हा हायकमांडचे दूत असणारे दिग्विजय सिंग आणि चेल्लाकुमार यांनी गुप्त मतदान घेतले ते नेता निवडीसाठी. गमतीचा भाग म्हणजे हा नेता म्हणजे विरोधी पक्षनेता, अशी शेरेबाजीही सामाजिक संकेतस्थळांवर (सोशल मीडिया) फिरू लागली.
विरोधी काँग्रेस पक्षाचे सतरा आमदार चोवीस तास येथील एका हॉटेलमध्ये राहिले होते. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग आणि चेल्लाकुमार यांनीही हॉटेलमध्येच मुक्काम ठोकलेला. त्यांनी नेता निवडीसाठी सर्व आमदारांशी चर्चा केली. काँग्रेस विधिमंडळ नेता तथा मुख्यमंत्रिपदाचा दावेदारच ठरत नसल्याने शेवटी सिंग यांनी सतराही आमदारांसाठी गुप्त मतदान घेतले. मात्र, त्या मतदानाचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपने मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांसह एकवीस आमदारांना घेऊन राजभवन गाठले आणि काँग्रेसची स्वप्ने धुळीस मिळाली. अर्थात या सगळ्यास जबाबदार ठरली ती काँग्रेसमधील अनास्था आणि मुख्यमंत्रिदासाठी तीन नेत्यांमधील स्पर्धा.
आता काँग्रेसकडे सतरा आमदार व भाजपकडे तेरा आमदार, तरी देखील भाजप सरकार बनवत आहे. मगोप भाजपलाच पाठिंबा देईल हे उघड होतेच; पण विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षानेही भाजपप्रणित आघाडीलाच पाठिंबा देऊन मनोहर र्पीकर यांचे नेतृत्व स्वीकारावे, असे ठरविले. काँग्रेसचे नेते लुईङिान फालेरो हे मुख्यमंत्रिपदावर दावा करून बसले होते. गोवा फॉरवर्डला फालेरो यांचे नेतृत्व नकोच. दिगंबर कामत किंवा राणे यांना मुख्यमंत्री बनवूया, अशा प्रकारची काँग्रेसच्या आमदारांमध्ये चर्चा होती. दिवसभर आमदार अस्वस्थपणे हॉटेलमध्ये फिरत होते. लवकर एकदा गोवा फॉरवर्डचा व अपक्ष आमदार रोहन खंवटे यांचा पाठिंबा घ्या, असे आमदार सुचवत होते; पण काँग्रेसचा विधिमंडळ नेता कोण हेच ठरेना. शेवटी रोहन खंवटेही कंटाळले व त्यांनीही पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित आघाडीचे सरकार स्वीकारले. 
दिग्विजय सिंग यांनी दुपारी तीननंतर सतराही आमदारांचे गुप्त पद्धतीने मतदान घेतले. आमदारांना नेता म्हणून फालेरो, कामत की राणे हवे हे दिग्विजय सिंग यांनी जाणून घेतले. रवी नाईक यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला नाही. दिग्विजय सिंग यांनी सुभाष शिरोडकर, बाबू कवळेकर व विश्वजित राणे यांच्याशीही स्वतंत्र चर्चा करून भूमिका जाणून घेतली. विश्वजित यांनी दिगंबर कामत देखील मुख्यमंत्री म्हणून चालतील; पण नेता लवकर निवडा, अशी विनंती दिग्विजय सिंग यांना केली. तथापि, राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर गुप्त मतदानाचा निकाल जाहीर करू, असे दिग्विजय सिंग यांनी सांगितले. दिग्विजय सिंग रात्रीर्पयत काँग्रेसचा नेता जाहीर करू शकले नाहीत. शेवटी काँग्रेसचे बहुतेक आमदार कंटाळले आणि त्यांनी घरचा रस्ता धरला. 
(खास प्रतिनिधी)

Web Title: Parrikar's Boeing is Congress Lean ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.