संघाच्या आदेशानेच पर्रीकर संरक्षण मंत्री, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 02:59 PM2017-12-28T14:59:34+5:302017-12-28T14:59:48+5:30

भाजप सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णपणे प्रभाव असून गोव्याचे संरक्षणमंत्री म्हणून जी मनोहर पर्रीकर यांची नेमणूक झाली होती ती संघाच्या आदेशामुळेच झाली होती असा, आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  शांताराम नाईक यांनी केला आहे. 

Parrikar's Defense Minister, Goa Congress State President's charge is alleged by the Sangh's order | संघाच्या आदेशानेच पर्रीकर संरक्षण मंत्री, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

संघाच्या आदेशानेच पर्रीकर संरक्षण मंत्री, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

Next

पणजी: भाजप सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्णपणे प्रभाव असून गोव्याचे संरक्षणमंत्री म्हणून जी मनोहर पर्रीकर यांची नेमणूक झाली होती ती संघाच्या आदेशामुळेच झाली होती असा, आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  शांताराम नाईक यांनी केला आहे. 

देशाच्या राजघटनेला विरोध असलेले आणि देशाच्या तिरंग्या झेंड्याला विरोध असलेले हे संघाचे लोक आहेत. ते खरे राष्ट्रविरोधी आहेत. घटनेतील धर्मनिरपेक्ष तत्वाचा या सरकारचे मंत्री करीत आहेत. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचा सर्वत्र निषेध व्हायला हवा असे ते म्हणाले. तसेच भाजपचे सुब्रमह्ण्यम स्वामीही धर्मनिरपेक्षतेबद्दल उलट सुलट बोलत आहेत. या तत्वाच्या घटनेतील समावेशाबाबत शंका उपस्थित करीत आहेत. अप्रत्यक्षरित्या हा घटनेशी केलेला द्रोह आहे असे त्यांनी सांगितले. संपूर्ण भाषणात त्यांनी गोव्यात सध्या गाजणाऱ्या म्हादयी प्रकरणाबाबते ते एकही शब्द बोलले नाहीत. 

काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनाच्या निमित्त कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री एदुआर्द फालेरो आणि आमदार प्रतापसिंग राणे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर, गिरीश चोडणकर, लुईझीन फालेरो, महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो आणि इतर नेते उपस्थित होते.
 

Web Title: Parrikar's Defense Minister, Goa Congress State President's charge is alleged by the Sangh's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.