पार्सेकरांचा निकाल सर्वप्रथम
By admin | Published: March 10, 2017 02:20 AM2017-03-10T02:20:15+5:302017-03-10T02:21:21+5:30
पणजी : शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल, तेव्हा उत्तर गोव्यात सर्वात प्रथम मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे
पणजी : शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल, तेव्हा उत्तर गोव्यात सर्वात प्रथम मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर पेडणे आणि इतर मतदारसंघ क्रमाक्रमाने घेतले जाणार आहेत. एकूण ७१ फेऱ्यांत संपूर्ण उत्तर गोव्याचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी सांगितले की, मांद्रे व पेडणे मतदारसंघापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. कांपाल येथील बालभवन केंद्रात होणाऱ्या या मतमोजणीसाठी ७ वाजता स्ट्राँग रूम्स खुले केले जाणार आहेत. पोस्टल मतांसाठी वेगळा स्ट्राँग रूम करण्यात आला आहे. ८ वाजता मतमोजणी हाती घेतली जाणार आहे. सुरुवातीला पोस्टल मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मते मोजली जाणार आहेत.
बालभवन केंद्राच्या दोन्ही इमारतींत मतमोजणी कक्ष उभारण्यात आले
आहेत. एकूण १२९ टेबल्सवर होणाऱ्या मतमोजणीत एकूण ७१ राउंड होणार
आहेत. त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीसाठीच्या कामात ६०० कर्मचारी, तर ४०० सुरक्षा रक्षक तैनात असतील.