सार्वजनिक गणेश मंडपामध्ये एटीएस कडून पेट्रोलिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 06:06 PM2023-09-21T18:06:34+5:302023-09-21T18:07:34+5:30
चतुर्थीच्या काळात कुठलाच अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
नारायण गावस
पणजी : चतुर्थीच्या काळात कुठलाच अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडपामध्ये एटीएस कमांडो भेट देऊन अलर्ट नाईट पेट्रोलिंगचे कर्तव्य बजावत आहेत. या सणासुदीच्या काळात विविध तालुक्यांमध्ये एकूण ५ एटीएस कमांडोची स्कॉड पथके तैनात आहेत. एसपी एटीएस आणि डीवायएसपी एटीएस यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय एटीएस (ऑपरेशन्स) द्वारे स्कॉड टीम्स सतत निरीक्षण केले जाते. विविध गणेश मंडळांमध्ये एटीएस स्कॉडच्या उपस्थितीचे समिती सदस्यांनी कौतुक केले आहे.
एटीएसप्रमाणे राज्यभरातील पोलीस विविध सार्वजनिक गणेश मंडपामध्ये देखरेखीसाठी तैनात करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरामध्ये वाढती चोरीची प्रकरणे तसेच कुठलेच हिंसा होऊ नये यासाठी ही पोलीस पथक तसेच एटीएस पथके पोलीस खात्यातर्फे तैनाद केली जात आहे. राज्यात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश पुजन केले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पाेलीसांचा पहारा असतो. मंडपात सदस्यासोबत पोलिसही नैनात आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांवर नियंत्रण येणार आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी एटीएस स्कॉड पेट्रोलींग करत असून मंडपाजवळ रात्रीचे संशयीत फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशीही केली जात जात आहे