स्वस्त धान्य दुकानदारांचे पैसे ताबडतोब द्या: गोवा फॉरवर्डचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:37 PM2023-11-08T16:37:52+5:302023-11-08T16:38:41+5:30
दिवाळीच्या अगोदर सर्व धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा करावा, अशी मागणी गाेवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली.
नारायण गावस
पणजी: राज्यात स्वस्त धान्य पुरवठा करणाऱ्या दुकानदारांना सरकारकडून गेल्या काही महिन्यांचे १ काेटी रुपयांचेबीलाचे पैसे देणे आहेत. सरकारने त्यांची ही थकबाकी ताबडतोब द्यावी. तसेच दिवाळीच्या अगोदर सर्व धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा करावा, अशी मागणी गाेवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी पणजी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे पैस अजून सरकारला मिळाले नसल्याने सरकारने या स्वस्त धान्य दुकानदारांचे पैसे प्रलंबित ठेवले आहेत. जर केंद्र सरकारकडून पैसे आले नाही तर राज्य सरकारने स्वत:चे पैस या दुकानदारांना देणे गरजेचे आहे. तसेच आता दिवाळी असल्याने सर्व स्वस्त धान्य दुकानावर धान्य पाेहचविणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची दिवाळीत परवड होणार नाही पण अजूनही अनेक स्वस्त धान्य दुकानावर धान्य साठ पोहचलेला नाही. यासाठी आम्ही राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याच्यावर याेग्य ती दखल घेण्याची मागणी केली आहे, असे दुर्गादास कामत यांनी सांगितले.
राज्यात स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक समस्या आहेत. तसेच नागरी पुरवठा खात्यात या अगोदर अनेक घाेटळे समोर आले आहे. गोवा फॉरवर्डने वेळोवेळी आवाज उठविले. पण अजून कुणावरच कारवाई झालेली नाही. याविषयी आम्ही सरकारला जाब विचारणार आहेत, असे दुर्गादास कामत म्हणाले.