ट्रकखाली सापडून पादचाऱ्याचा मृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2015 02:03 AM2015-04-17T02:03:26+5:302015-04-17T02:03:43+5:30
वास्को : गुरुवारी सकाळी एलमोंत थिएटरनजीक झालेल्या एका अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला़ मुरगाव
वास्को : गुरुवारी सकाळी एलमोंत थिएटरनजीक झालेल्या एका अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला़
मुरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात गुरुवारी सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास घडला़ त्या वेळी अभय प्रभु यांच्या मालकीचा ट्रक क्र. जीए - ०५/टी - १२८९ हा सडा येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदळाच्या गोणी घेऊन फ ोंडा येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात जात होता़ त्या वेळी एलमोंत थिएटर जवळ रस्त्यावरून जात असलेल्या एका अज्ञात इसमास धडक लागली़ या धडकेत तो खाली कोसळला आणि ट्रकचे पुढील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला आणि त्याचे जागीच निधन झाले़ त्याचा चेहऱ्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याने तसेच कपड्यात कोणत्याच प्रकारचे ओळखपत्र न मिळाल्याने त्याची ओळख पटू शकली नाही; पण त्याच्या पेहरावावरून तो एक मजूर असावा, असा पोलिसांचा तर्क आहे़ मुरगाव पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच मुरगाव पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक कोरगावकर हे घटनास्थळी हजर झाले आणि अपघाताचा पंचनामा करून मृत्तदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसिओत पाठवून दिला. या अपघात प्रकरणी मुरगाव पोलिसांनी ट्रकचालक समोल कुमार याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे़
दिस्तेरो रेल्वे व पूल ते सडा जंक्शन या रस्त्यावर अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात़ त्यामुळे हा रस्ता अपघातग्रस्त रस्ता म्हणून मानला जात आहे़ या रस्त्यावर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे़ सडा भागात भारतीय अन्न महामंडळाची गोदामे असल्याने या रस्त्यावरून नेहमी रेल्वेमधून आलेले धान्य बायणा येथील रेल्वे यार्डातून सडा गोदामात आणले जाते आणि त्यानंतर गोवा सरकारच्या नागरी पुरवठा खाते खरेदी करून आपल्या कुठ्ठाळी येथील गोदामात ठेवण्यात येते़ त्यामुळे या रस्त्यावरून धान्य भरलेल्या ट्रकांची नेहमी ने-आण करणारी वाहतूक चालूच असते़ तसेच सडा भागात राहणाऱ्या नागरिकांची संख्याही जास्त असल्याने त्यांची दुचाकी व चारचाकी वाहनांची रहदारीही मोठ्या प्रमाणात होत असते़ हा रस्ता अरुंद असल्याने व वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने दिस्तेरो पूल ते सडा हा मार्ग अपघातग्रस्त रस्ता मानला जातो़ दिस्तेरो-सडा या मार्गावरील वाहनांची रहदारी पाहून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी यापूर्वीच या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतलेले असून कामाला प्रारंभही झालेला आहे़ येत्या वर्षभरात या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे़ तसेच भारतीय महामार्ग प्राधिकरणाने स्थगित झालेल्या वरुणापुरी ते मुरगाव बंदर पर्यंतच्या चौपदारी महामार्गाचे काम हाती घेतल्याने भविष्यकाळात या मार्गावरील अवजड वाहनांची रहदारी बंद होईल आणि त्यामुळे अपघात होण्याचेही टळणार आहे़ (प्रतिनिधी)ू