सावधान! कोकण रेल्वेतून विनातिकिट रेल्वे प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई
By सूरज.नाईकपवार | Published: December 20, 2023 05:52 PM2023-12-20T17:52:11+5:302023-12-20T17:52:48+5:30
नोव्हेंबर महिन्यात ७ हजार १३ फुकटया प्रवासांवर कारवाई: २ कोटी ५ लाख दंड वसूल
सूरज नाईकपवार,मडगाव: कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवासांवर रेल्वे प्रशासनाने करडी नजर ठेवली असून, मागच्या महिन्यात नोव्हेंबरला एकूण ७ हजार १३ प्रवासांवर कारवाई करताना त्यांच्याकडून २ कोटी ५ लाख ५५ हजार ४४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत फुकटया प्रवासांकडून ८६ लाखांचा दंड वसूल केला गेला होता.
वरील तीन महिन्यात एकूण १४,१५० विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासांना कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्यातून ८६ लाख,३७ हजार , ८२० रुपये दंड वसूल केला गेला होता. ऑगस्टमध्ये ४,४८४ प्रवासांना पकडून, २६ लाख ६७ हजार ५५५ रुपये तर सप्टेंबर महिन्यात ४,८८८ प्रवाशांकडून २७ लाख, ९ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
ऑक्टोबर महिन्यात ४,७७८ जणांवर कारवाई करुन ३२ लाख ६० हजार ५६५ रुपये दंड वसूल केला गेला.प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासंनाकडून करण्यात आले आहेत.